पद्मशाली सखी संघमच्यावतीने कात्यायनी कुचनचा सन्मान

राष्ट्रीय अस्मिता महिला योगासन लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ अंतर्गत राष्ट्रीय अस्मिता महिला योगासन लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र संघातील कात्यायनी वेंकटरमण कुचन हिचा श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्यावतीने सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राच्या १८ वर्षाखालील युवती संघाने लक्षवेधी कामगिरी करत कांस्यपदक प्राप्त केले होते. या संघात कात्यायनी वेंकटरमण कुचनचा समावेश होता. पद्मशाली सखी संघमच्या सचिवा रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी कात्यायनी कुचन हिचा सन्मान केला. यावेळी मोहन कुचन, माधुरी कुचन, वेंकटरमण कुचन, उत्कर्षा कुचन, सखी संघमच्या गीता भूदत्त, पल्लवी संगा, पद्मा मेडपल्ली, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली, गौरीशंकर कोंडा, नरेंद्र धारा आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *