Ishalwadi | ईशाळवाडी पुनर्वसनासाठी बालाजी फाउंडेशनकडून २५ लाखांची मदत

25 lakhs assistance from Balaji Foundation for Ishalwadi rehabilitation
फोटो : ईशाळवाडी पुनर्वसनासाठी बालाजी फाउंडेशनकडून 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करताना जनसंपर्क अधिकारी विनोद चुंगे. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर : प्रतिनिधी

जुलैची रात्र ईशाळवाडी (Ishalwadi) ग्रामस्थांसाठी दुर्दैवी ठरली. मात्र बालाजी अमाईन्स संचालित संस्था बालाजी फाउंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी आणि संवेदना जपत तत्परतेने ट्रकभरुन राशन, जीवनोपयोगी साहित्य आणि औषधे पाठवून दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 25 लाखांचा धनादेश सुपूर्द करत मदत करण्यात आली.

ईशाळवाडी (Ishalwadi) ग्रामस्थांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांच्या पुनर्वसनासाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी 25 लाखांची मदत राज्य शासनाकडे सुपूर्द केली आहे. 24 जुलै रोजी मुंबई येथील विधानभवनात बालाजी अमाईन्सचे जनसंपर्क अधिकारी विनोद चुंगे यांनी 25 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंढे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *