वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप निवड चाचणीसाठी तयारी सुरू

जिल्ह्यातील 15  वर्षांखालील व्हॉलीबॉल खेळाडूंची  निवड चाचणी होणार

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाच्यावतीने शांग्लूओधीन (चीन) येथे दि. 4 ते 13 डिसेंबरदरम्यान वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप: 2025 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 15 वर्षांखालील मुले व मुलींसाठी असून, भारताचा शालेय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 15 वर्षांखालील व्हॉलीबॉल खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निवड चाचणीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  नरेंद्र पवार यांनी  केले आहे.

 राष्ट्रीय निवड चाचणी : भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय संघ निवडीसाठी दि.  25 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे)  येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे.  मुले : दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता रिपोर्टिंग करावे.  27 ऑगस्टला प्रस्थान.  मुली: दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता रिपोर्टिंग, 30 ऑगस्टला प्रस्थान.

राज्य निवड चाचणी : राज्य संघ निवडीसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी पुण्यातच दि. 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.  त्यासाठी थेट विभागीय निवड चाचणी दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र मंडळाचे चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय, पुणे येथे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

महत्त्वाचे दस्तऐवज :

  • निवड चाचणीसाठी सहभागी खेळाडूंनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत:
  • – जन्म दाखला (सरकारी प्राधिकरणाकडून)
  • – आधार कार्ड
  • – शाळेतील इयत्ता पहिलीमधील प्रवेशाचा जनरल रजिस्टरची छायांकित प्रत
  • – पासपोर्ट (डिसेंबर 2025 पासून किमान 6 महिन्यांची वैधता आवश्यक)
  • – पाच पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीवर)

संपर्कनिवड चाचणीसाठी आणि अधिक माहितीसाठी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्याशी (मो. 7219155252) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *