दुहेरी मार्ग सुरू करण्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक
सोलापूर : प्रतिनिधी
मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड – मनमाड सेक्शनमध्ये बेलापुर ते पढेगाव दरम्यान (दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी काम हाती घेतले आहे. यामुळे ट्राफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक 12 जुलै 2023 ते 20 जुलै 2023 पर्यंत असेल. त्यामुळे या मार्गावरील गाड्या रद्द केल्या असून त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच काही गाड्या नियमित वेळेपेक्षा 2 ते 4 तास उशिरा सुटणार आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणे
– यात्रा प्रारंभ दिनांक 19 जुलै 2023 ते 20 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 11409 दौंड – निजामाबाद डेमु रद्द.
– यात्रा प्रारंभ दिनांक 18 जुलै 2023 ते 19 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 11410 निजामाबाद – दौंड डेमु रद्द.
(लिंक ट्रेन 01413/01414 निजामाबाद – पंढरपूर – निजामाबाद ही सोलापूर – दौंड – पुणे वरुन कुर्डूवाडी – पंढरपूर मार्गे रॅक जोडून चालवली जाईल.)
– मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या
•यात्रा प्रारंभ दिनांक 18 जुलै 2023 आणि 19 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 12627 बेंगलूरू – न्यू दिल्ली एक्सप्रेस ही व्हाया दौंड – पुणे – लोणावळा – पनवेल – कल्याण – इगतपुरी – मनमाड मार्गे धावेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 18 जुलै 2023 आणि 19 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 12780 हजरत निझामूद्दीन – वास्को – द – गामा एक्सप्रेस ही व्हाया मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – लोणावळा – पुणे मार्गे धावेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 18 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 12629 यशवंतपूर – हजरत निझामूद्दीन एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा – कर्जत – पनवेल – कल्याण – इगतपुरी – मनमाड मार्गे धावेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 19 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 12104 लखनऊ – पुणे एक्सप्रेस ही व्हाया मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – कर्जत – लोणावळा – पुणे मार्गे धावेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 19 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 22685 यशवंतपूर – चंदीगड एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा – वसई रोड – वडोदरा जं. – रतलाम – संत हिरदाराम मार्गे धावेल.
रिशेड्यूल करण्यात आलेल्या गाड्या
•यात्रा प्रारंभ दिनांक 17 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 02131 पुणे – जबलपुर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 2 तास दुपारी 01.30 वाजता सुटेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 17 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 02131 पुणे – हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 2 तास दुपारी 12.45 वाजता सुटेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 17 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 02131 पुणे – गोरखपुर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 2 तास दुपारी 12.45 वाजता सुटेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक 18 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 12103 पुणे – लखनऊ एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 2 तास दुपारी 12.45 वाजता सुटेल.
•यात्रा प्रारंभ दिनांक. 19 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 22845 – पुणे – हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 4 तास संध्याकाळी 03.30 वाजता सुटेल.
रेगुलेशन ऑफ मेल एक्सप्रेस
•यात्रा प्रारंभ दिनांक 19 जुलै 2023 ते 20.07.2023 रोजी गाडी क्र. 12628 न्यू दिल्ली – बेंगलूरू एक्सप्रेस •यात्रा प्रारंभ दिनांक 20 जुलै 2023 रोजी गाडी क्र. 01921 पुणे – वीरांगना लक्ष्मी बाई एक्सप्रेस