सबजुनिअर, जूनियर थ्रोबॉल जिल्हा स्पर्धेसाठी ३०० खेळाडूंचा सहभाग

By assal solapuri ।।
सोलापूर : शहर व जिल्हा सबजुनिअर व जुनिअर आमंत्रित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सुजाता जुगदार, प्रा संतोष खेंडे, मारुती घोडके, नागप्‍पा मैंदर्गी, श्रीधर गायकवाड, धर्मराज कट्टीमनी, प्रसन्न काटकर, संतोष पाटील, विठ्ठल सरवदे व खेळाडू.

सबजुनिअर, जूनियर थ्रोबॉल जिल्हा स्पर्धेसाठी ३०० खेळाडूंचा सहभाग

By assal solapuri ।।
सोलापूर : थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर व छत्रपती शिवाजी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सोलापूर शहर व जिल्हा सबजुनिअर व जुनिअर आमंत्रित स्पर्धेसाठी सोलापुरातील १५ मुले व १० मुलींचे संघ असे एकूण ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांच्या हस्ते व थ्रोबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे, सचिव मारुती घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या संघटनेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय पाटील, नागप्‍पा मैंदर्गी, प्रशांत राणे, श्रीधर गायकवाड, धर्मराज कट्टीमनी, प्रसन्न काटकर हे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी शरद पवार प्रशालेचे राजाराम शितोळे, श्रीराम बरगंडे, व्हॅलेंटाईन स्कूलचे लावण्या दुस्सा, संतोष पाटील, जैन गुरुकुलचे प्रसन्न काटकर, अण्णाप्पा काडादी प्रशालेचे नागप्पा मैंदर्गी, राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचे अतुल सोनके, मंगरुळे हायस्कूल अक्कलकोटचे सिद्धेश्वर घुगरे आदी क्रीडाशिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.संतोष खेंडे, आभार प्रदर्शन मारुती घोडके यांनी मांडले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *