सोलापूर : प्रतिनिधी
ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर येथे समर कॅम्पचे उद्घाटन स्कूलच्या आदर्श प्राचार्या अमृता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
हा समर कॅम्प इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी असून 10 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. या कॅम्पसाठी सोलापूर शहरामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. पालकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. ज्ञानदीप पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून एक पाऊल नेहमीच पुढे असते. या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून सोलापूर शहरासह ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
समर कॅम्प यशस्वी करण्यासाठी स्कूल मधील आदर्श प्राचार्या अमृता शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहिणी जगताप, पुनम देवगावकर,शितल शिंदे, अमृता कदम, वाहिद सय्यद, अनुप घाटे, सोनाली कापसे, स्नेहल परदेशी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.