राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र : एक कार, दोन दुचाकीसह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात अवैध मद्य विक्री, साठवणुकीबाबतची तक्रार करण्याचे आवाहन

 by assal soalpuri ||

सोलापूर  : राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे जिल्ह्यात धाडसत्र सुरु असून, अवैध हातभट्टी दारू निर्मिती व अवैध दारू वाहतूकप्रकरणी एक कार व दोन दुचाकी वाहनासह सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २१ ऑगस्ट २०२४  ते दि. २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव,  राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर मुख्यालयाचे उपअधीक्षक एस. आर.पाटील  यांच्या मार्गदर्शनखाली राज्य उत्पादन शुल्क सोलापूरचे अधीक्षक  भाग्यश्री जाधव यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली  राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व अवैध दारू वाहतूक याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव, वडजी तांडा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात टाकलेल्या   धाडीमध्ये हातभट्टी दारू निर्मितीबाबत एकूण २० गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

========================================================================================

  • या २० गुन्ह्यांमध्ये २८,४०० लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. १५१५ लिटर हातभट्टी दारू जप्त करून तेही नष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपी फरार आहेत, तर १४ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.
  • निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ आणि ब विभाग, भरारी पथक, पंढरपूर, माळशिरस विभाग यांनी अवैध हातभट्टी निर्मिती व अवैध दारू विक्री केंद्रांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेमध्ये एकूण २० गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामध्ये २०४०० लिटर रसायन, १५१५ लिटर हातभट्टी दारु जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. यासह देशी-विदेशी व बियरही जप्त केले  आहे. त्यांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एका चारचाकी वाहन आणि  दोन दुचाकी वाहनांचादेखील समावेश आहे. या धाडसत्रांमध्ये एकूण  १८७५०४० रुपये  रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

====================================================================================

ही कारवाई  निरीक्षक जगन्नाथ पाटील, अविनाश घाडगे, रामचंद्र चवरे, निरीक्षक पंकज कुंभार, सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, धनाजी पोवार, दत्तात्रय लाडके, मानसी वाघ, श्रद्धा गडदे,  दुय्यम निरीक्षक, डी.बी.पाटील, जीवन मुंडे, आलिम शेख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक होळकर, जवान पांढरे, तोग्गी, गोडिकट, इंगवले, माळी, करचे, वेळापुरे, बेगमपुरे, खंदारे, रशीद शेख, दीपक वाघमारे, संजय नवले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिले यांनी केली.

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, साठवणूक, गोवा राज्य निर्मित मद्य, बनावट मद्याची विक्री वाहतूक अथवा साठयाबाबत माहिती असल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा सोलापूर यांच्याकडे (टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३) करावीत. नाव व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा सोलापूर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *