वयाच्या ओळखपत्र संदर्भातील खेळाडूंवर लादलेल्या नव्या अटी अत्यंत क्लिस्ट, त्रासदायक

अनेक खेळाडू क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहणार: शरदचंद्र धारूरकर

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

  सोलापूर : वयाच्या ओळखपत्रासंदर्भातील खेळाडूंवर नव्याने लादलेली  अट अत्यंत क्लिस्ट, त्रासदायक आहे. त्यामुळे अनेक खेळाडू क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहणार असल्याची भीती  महाराष्ट्र राज्य  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष  शरदचंद्र धारूरकर यांनी व्यक्त केली आहे.

 प्रतिवर्षी राज्यात शालेय खेळाडूंसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या  स्पर्धा विविध वयोगटानुसार होत असतात. यासाठी प्रत्येक खेळाडूंच्या वयासंदर्भात सत्यता पडताळण्यासाठी शालेय स्तरावरुन ओळखपत्र दिले जाते. सदर ओळखपत्र शाळेच्या अधिकृत रेकॉर्डवरूनच (जनरल रजिष्टर)  मुख्य़ाध्यापकांच्या  स्वाक्षरीने दिले जाते. त्यामुळे ही सर्व दाखले अधिकृत आणि ग्राह्य धरले जातात. परंतु याचा दुरुपयोगही होऊ शकतो.  क्रीडा स्पर्धेदरम्यान चुकीचे दाखले सादर करुन  खेळाडूंना खेळविले जाते, हे चुकीचे आहे, असा आरोप धारूरकर यांनी केला. असे असताना तो खेळाडू सध्या ज्या संस्थेत  शाळा- महाविद्यालात शिकत असतो त्या शाळेच्या अधिकृत रेकॉर्डवर  अविश्वास दाखविला जात आहे, ही बाब योग्य नाही. असेही धारूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. यंदाच्या वर्षी वयाच्या ओळखपत्रासंदर्भात अत्यंत क्लिस्ट व त्रासदायक अटींची पुर्तता करण्यास सांगण्यात आलेले आहे.  ही संघटक बाब अत्यंत चुकीची आहे. या अटीमुळे यावर्षी शेकडो शालेय खेळाडू या शालेय क्रीडास्पर्धांपासून वंचित राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. अशी अनेक कारणे आहेत की, ज्यामुळे शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांना त्यांच्या वयाचे जुने रेकॉर्ड सहजा-सहजी व वेळेत उपलब्ध होऊ शकणार नाही.

यावर्षांपासून सदर ओळखपत्रासाठी खाली नमूद रेकॉर्ड सादर केले तरच त्या खेळाडूला शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. ते रेकॉर्ड पुढीलप्रमाणे…

  • जन्माच्या पाच वर्षापर्यंतचा शासनाकडे नोंद केलेला दाखला.
  •  खेळाडू पहिलीमध्ये ज्या शाळेत होता त्या शाळेचा निर्गम उतारा.
  • आधारकार्ड.
  •  वरील तीन दाखल्यामध्ये आधार कार्ड वगळता बाकी दोन कागदपत्रे  मिळविण्यासाठी लागणारा कालावधी, तो रेकॉर्ड
  • सहजा-सहजी उपलब्ध करुन घेण्यासाठीचा त्रासदायक प्रयास आणि ते मिळेलच याची शाश्‍वती.
  • वरील  या सर्व बाबी अत्यंत क्लिष्ट आहेत. कारण यामध्ये अनेक अडचणी आहेत. या अडचणी अशा आहेत की, जर बदली होवून अन्य जिल्हा व राज्यातून  एखाद्या शाळेत प्रवेशित मुले.
  • शाळाबाह्य मुलांनी आर.टी.ई. नियम, वयोमानानुसार वरच्या वर्गात प्रवेशित मुले.
  •  खालच्या वर्गात चुकीचे वय लागले, ते शासन नियमानुसार सर्व प्रक्रिया पुर्ण करुन शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने
  • विभागीय सचिव वरच्या वर्गात बदललेले वय.
  •   गावाकडील जिल्हा परिषद वा अन्य शाळेतील निर्गम उतारा आणण्यासाठीचा कालावधी, खर्च व विनाकारण
  • होणारा त्रास.
  •   याशिवाय खेळाडूंची (वय तपासणी चाचणी) एज व्हेरिफिकेशन टेस्ट ही घेतली जाते. त्यामुळे सुमारे अडीच हजार रुपये इतका अतिरिक्त खर्च  खेळाडूंवर पडणार आहे.
  • या सर्व बाबी म्हणजे सध्या विद्यार्थी ज्या शाळेत आहे त्या शाळेवर दाखविला जात असलेला अविश्‍वास.तरी  यासर्व बाबी  गंभीर आहेत.  वरील सर्व बाबींचा विचार करुन या सर्व अटीऐवजी चुकीची वये सादर करण्यावर बंधन आणण्यासाठी प्रचलित वा अन्य उपाय लागू करावेत.

अशी मागणी  महाराष्ट्र राज्य  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष  शरदचंद्र धारूरकर यांनी केली आहे. सदर आशयाची मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल आदमाने, सचिव चांगदेव पिंगळे, उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे स्वाक्षरीद्वारे केली आहे. तसेच सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार यांच्यासह पदाधिकार्यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *