मोहम्मद नवाजची अष्टपैलू कामगिरी; पाकिस्तानला तिरंगी मालिकेचे विजेतेपद
पहिल्याच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मोहम्मद नवाझची हॅटट्रिक; 19 धावात 5 बळी
BY ASSAL SOLAPURI ||
PAKISTAN WIN T-20 TRI-SERIES 2025: आपल्या पहिल्याच पदार्पणाच्या (T-20) टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या (PAKISTAN’S MOHAMMAD NAWAZ) मोहम्मद नवाजची कामगिरी लक्ष्यवेधी ठरली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले. मोहम्मद नवाजने गोलंदाजीत हॅटट्रिकसह 19 धावात पाच बळी आणि दोन षटकाराच्या मदतीने 21 चेंडूतील 25 धावांमुळे पाकिस्तान विजयी झाला.
शारजाह क्रिकेट स्टेडियम, दुबई येथील (T-20 TRI-SERIES 2025) टी-२० तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला 75 धावांनी पराभूत केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने 20 शतकात 8 बाद 141 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १5.5 षटकात अवघ्या 66 धावातच गारद झाला. या तिरंगी मालिकेतील विजयाने पुढील आठवडयात सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाचा (Increased confidence) आत्मविश्वास उंचावला आहे. या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही संघाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे या फायनलमध्ये नाणेफेकीचा कौलदेखील महत्वपूर्ण ठरला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. कर्णधार सलमान आघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब राहिली.

सामन्याच्या पाचव्याच षतकात पाकिस्तानला जरब धक्का बसला. अफगाणीस्तानचा गोलंदाज रहमानउल्लाह गुरबाजने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला पहिल्या षटकात शून्यावर बाद बाद केले. त्यावेळी संघाची स्थिती केवळ तीन चेंडूत 5 धावा अशी होती. त्यानंतर सईम अयुब (17), फखर जमान (27), कर्णधार सलमान आघा (24), यष्टीरक्षक मोहम्मद हरीस (2), मोहम्मद नवाज (25), फहीम अशरफ (15), शाहीन आफ्रिदी ( नाबाद 2 धावा) यामुळे पाकिस्तानने २० षटकात 8 बाद 141 धावा केल्या. गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून कर्णधार राशीद खान (4 षटकात 38 धावांत तीन बळी), नूर अहमद (4 षटकांत 17 धावांत दोन बळी), फझलहक फारुकी (3 षटकात 19 धावांत दोन बळी), एएम गजनफर (4 षटकात 27 धावांत एक बळी) यांच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानला 141 धावात रोखता आले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने अफगाणिस्तानला 15.5 षटकात 66 धावांत रोखले. अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक रहमानउल्लाह गुरबाज (5 धावा), सेदीकुल्लाह अटल (13 धावा), इब्राहिम झद्रान (15 चेंडूत 9 धावा), मोहम्मद नबी (10 चेंडूत 3 धावा), कर्णधार राशीद खान (18 चेंडूत 17 धावा), नूर अहमद (3 धावा), एएम गजनफर (7 धावा), फजलहक फारुकी (नाबाद २ धावा) हे मोठी खेळू करू शकले नाहीत. दरविश रसुली, अजमतुल्लाह ओमरझाई आणि करीम जानत हे तिघेही भोपळाही न फोडता तंबूत परतले. गोलंदाजीत पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने हॅटट्रिकसह 19 धावात पाच बळी घेतले.अबरार अहमद, सुफियान मुकीम यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.शाहीन आफ्रिदीने एकमेव बळी घेतला.