डॉ. माधवी रायते यांची माहिती : पहिलीपासून ते ज्येष्ठापर्यंतच्या स्पर्धकांचा सहभाग राहील
by assal solapuri ||
सोलापूर : विद्याव्रर्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर देदीप्यमान यश प्राप्तीसाठी सर्वांग सुंदर हस्ताक्षराला अनन्यसाधारण असे महत्व असते, हे जाणून “आनंदश्री प्रतिष्ठान”च्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही खुल्या हस्ताक्षर सुलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आनंद्श्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. माधवी रायते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धा रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत “ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, डफरीन चौक, सोलापूर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
===========================================================================================
-
या स्पर्धेसाठी तीन गट पाडण्यात आले आहेत..
-
पहिला गट शालेय गट (मराठी- इंग्लिश) असून, यामध्ये पहिली ते सातवी , आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
-
पहिली ते सातवी या गटातील स्पर्धा सकाळी ९ ते १० आणि आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
-
महाविद्यालयीन गटाच्या (मराठी – इंग्लिश) स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
-
प्रौढ खुल्या गटातील (मराठी-इंग्लिश) स्पर्धेसाठी प्रौढ खुल्या गटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
-
या स्पर्धा दुपारी १२ ते १ या वेळेत होतील. यासाठी प्रत्येक विषयासाठी १० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे.
-
प्रत्येक भाषेत (मराठी – इंग्लिश) प्रत्येक गटात प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५०० रुपये, ३०० आणि २०० रुपये, प्रशस्तिपत्र आणि पदक प्रदान करण्यात येईल.
-
याशिवाय स्पर्धकांची संख्या १०० पेक्षा अधिक असणाऱ्या प्रत्येकी २५ स्पर्धकामागे एक उत्तेजनार्थ १०० रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तिपत्र देण्यात येईल.
-
प्रत्येक गटात पारितोषिकासाठी किमान २५ स्पर्धक असणे आवश्यक आहे.
- ======================================================================================
स्पर्धकांनी प्रत्येक गटाला दिलेल्या वेळेतच उपस्थित रहावयाचे असून, विद्यार्थी स्पर्धेला अनुपस्थीत राहिल्यास प्रवेश फी परत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे. सुलेखन स्पर्धेसाठी उतारा तसेच उतारा लेखनासाठी कागद प्रतिष्ठानकडून पुरविण्यात येणार आहे. अन्य लेखन साहित्य स्पर्धकांनी आणावयाचे आहे. पेंड, निळे/काळे शाईचे पेन, जेल पेन, पट्टी, रबर आदी साहित्य स्पर्धकांनी सोबत आणावयाचे आहे. स्पर्धेतील निकाल प्रतिष्ठानच्या परीक्षकाच्या निर्णयानुसार अंतिम असणार आहे. तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी (९८८१०६१२१३, ९८५०७३४६२८) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. माधवी रायते यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस जयंत रायते, महादेवी उडचण, प्रदीप बेलुरे आदी उपस्थित होते.
