पैलवान भरत मेकाले यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर: भगवा आखाडा गवळी तालीमतर्फे पैलवान भरत मेकाले यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भरत मेकाले यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भगवा आखाडाचे वस्ताद दशरथ मिसाळ, वैजीनाथ जाधव, विश्वनाथ बारसे, शिवाजी परळकर, महेश कोळी, चौबल मन्सावले, दीपक बहिरवाडे, विठ्ठल कलगते, युवा उद्योजक नरेश लकडे आदी पैलवान मंडळी उपस्थित होते.

