तहसीलदार शिल्पा पाटील यांचे आवाहन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट डी.बी.टी. साठी आधार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2024 पासून संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ डी. बी. टी. (DBT) प्रणालीव्दारे देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवर नोंदणी व आधार प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. डीबीटी पोर्टलवर आधार नोंदणी न झालेल्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने दि.18 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून लाभार्थी यांनी आपले आधार नोंदणी व प्रमाणीकरण करुन घ्यावे. असे आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील ( संगांयो शहर कार्यालय, सोलापूर ) यांनी संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केले आहे.

शिबिराचे ठिकाण व दिनांक :
- दि. 18 ऑगस्ट. 2025 : विरशैव ककैय्या समाज मंदीर, ढोर गल्ली , पंचमुखी हनुमान मंदीर वालचंद गेटसमोर.
- दि. 19 ऑगस्ट. 2025 : विरशेव ककैय्या समाज मंदीर, ढोर गल्ली , दत्त चौक, दाजी पेठ राममंदीर सोलापूर, रुग्णालय शेजारी.
- दि. 20 ऑगस्ट. 2025 : विरलिगेश्वर समाज मंदीर घोंगडे वस्ती, महानगरपालिका कॅम्प शाळा, लष्कर.
- दि. 21 ऑगस्ट. 2025 : विरलिंगेश्वर समाज मंदीर घोंगडे वस्ती, सिध्दगणेश हनुमान मंदीर, भारतरत्न इंदिरा नगर.
- दि. 22 ऑगस्ट. 2025 : मडिवाळेश्वर माचदेव परीट जाती मंडळ ट्रस्ट कन्ना चौक, अष्टभुजा देवी मंदीर मोदीखाना.
- या ठिकाणी लाभार्थ्यांनी आधार नोंदणी व प्रमाणीकरण करावेत.जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत, ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील, याची नोंद घ्यावी. असे आवाहन संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालय, सोलापूर यांच्याकडून करण्यात येत आहे.