रामचंद्र नष्टे लिखित “ध्यास हा अध्यात्माचा” ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
By assal solapuri|
सोलापूर : महाराष्ट्र वीरशैव सभा सोलापूरच्यावतीने शमचंद्र संभूअप्पा नष्टे लिखित “ध्यास हा अध्यात्माचा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र भवन, जानकीनगर शेजारी, जुळे सोलापूर होणार आहे.
हा प्रकाशन सोहळा जगद्गुरू श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठ यांच्या हस्ते आणि माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी ( गौडगांव) यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर होनराव, प्रदेश कोषाध्यक्ष प्रा. सुरेंद्रशेठ गाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
महाराष्ट्र वीरशैव सभा सोलापूर या संस्थेच्यावतीने सोलापुरातील शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार आणि श्री सिध्देश्वर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक रामचंद्र संभूअप्पा नष्टे लिखीत ध्यास हा अध्यात्माचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश घोंगडे, सरचिटणीस नरेंद्र गंभीरे, खजिनदार प्रकाश हत्ती, शहर सरचिटणीस नितीन झाडबुके, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष उत्कर्ष शेटे, युवा आघाडी शहराध्यक्ष राज पाटील, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी पुष्पा गुंगे, शहराध्यक्ष महिला आघाडी स्मितादेवी उंब्रजकर यांच्यासह समस्त महाराष्ट्र वीरशैव सभा सोलापूर शहर व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.