ही केवळ अफवा; नरेंद्र पवार यांचे स्पष्टीकरण: जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांचा राजीनामा की स्वेच्छा निवृत्ती?
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरचे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या व्हायरल झाली आहे. नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिलेला आहे की स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, याविषयी चर्चेला उधाण आले आहे. मात्र याविषयीची चर्चा ही केवळ अफवा असल्याचा खुलासा स्वतः जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी “अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क”शी बोलताना केला आहे.
शालेय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाविषयी काही क्रीडा शिक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली, तेव्हा जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिला आहे की स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, याविषयी या क्रीडा शिक्षकांमध्ये कुजबुज आणि चर्चा सुरु होती. दरम्यान, नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिला आहे की, स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, याविषयीची अधिकृत कोणतीही बातमी समोर आली नाही.
“अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क”च्या प्रतिनिधीनी जेव्हा जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनाच थेट त्यांचा राजीनामा आणि स्वेच्छा निवृत्ती या संदर्भात विचारले असता त्यांनी याचे खंडन केले असून, ही केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

-
यासंदर्भात अधिक खुलासा, स्पष्टीकरण देताना जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार म्हणाले, ही बातमी कोणी सांगितली? असा सवाल “अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क”शी केला. आपण राजीनामा दिल्याची केवळ अफवा असून, ही अफवा पसरवली जात आहे. दरम्यान, बोलता बोलता त्यांनी स्वेच्छा निवृत्ती दिलेली आहे, असेही सांगितले. मात्र याविषयी त्यांनी अधिक खुलासा आणि माहिती देणे टाळले, उलट त्यांनी ही बातमी कोणी सांगितली? त्यांनाच विचारा असे सडेतोड उत्तर दिले.
या संदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक तथा सोलापूर जिल्ह्याचे भूतपूर्व जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांना विचारले असता, त्यांनी यासंदर्भात आपणास काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
