हकीम डॉ. अताउल्लाह खान यांचे शनिवारी विजापूर वेशीत आरोग्य शिबीर
आयोजक ददापुरे अँड सन्सचे मालक जुनैद ददापुरे यांची माहिती
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जगप्रसिद्ध भारताचे नंबरवन वैद्य हकीम डॉ. अताउल्लाह खान यांचे शनिवार, दि. ३१ ऑगस्ट ०२०२४ रोजी सोलापुरात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक ददापुरे अँड सन्सचे मालक जुनैद ददापुरे यांनी “अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क”शी बोलताना दिली. विजापूर वेस येथील सहस्रार्जुन मंगल कार्यालय नजीकच्या ददापुरे कॉम्प्लेक्स, राहत सेंट्रल पार्क, सोलापूर येथे या शिबिराचे सकाळी ६ ते सायंकाळी ५ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे.
हकीम डॉ. अताउल्लाह खान हे भारतातील नंबरवन वैद्य असून, त्यांच्या औषधोपचारामुळे आजपर्यत अनेक असाध्य असे रुग्ण बरे झाले आहेत. कोणतेही आजार असो, हकीम डॉ. अताउल्लाह खान यांच्या औषधोपचारामुळे तो बर होतोच, असा आजपर्यंतचा आमचा अनुभव असल्याचे जुनैद ददापुरे यांनी सांगितले. कॅन्सर, दमा, संधिवात, लकवा अशा अनेक प्रकारच्या असाध्य अर्थात बरे न होऊ शकणाऱ्या आजारांवर डॉ. अताउल्लाह खान यांचे औषध काम करीत असते. कोणत्याची वयोगटाचा रुग्ण असो, डॉ. अताउल्लाह खान यांच्या औषधोपचाराला प्रतिसाद देत असतो. लवकर त्याचे आजारपण बरे होत असते.
डॉ. अताउल्लाह खान हे समाजातील कोणत्याही जाती-धर्माचे, वंशाचे, समाजाचे रुग्ण असोत, त्यांच्यावर ते सर्वधर्म समभाव या भावनेतून औषधोपचार करीत असतात. त्यामुळे त्यांच्या औषधोपचाराचा लाभ सर्व जातीधर्माचे लोक घेत असतात. समाजातील अनेक गोर-गरीब रुग्णांना डॉ. अताउल्लाह खान हे मोफत औषधोपचार करीत असतात. सदरचे शिबीर हे सर्वांसाठी खुले असून, याचा सोलापुरातील नागरिकांनी लाभ, घ्यावा, असे आवाहन आयोजक ददापुरे अँड सन्सचे मालक जुनैद ददापुरे यांनी केले आहे.