
राज्यपालांना १० जानेवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे निमंत्रण
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
मुंबई : राज्याचे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी भेट घेतली.
कुलगुरू प्रा. महानवर यांनी राजभवनला भेट देऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना दि. १० जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या २० व्या दीक्षांत समारंभाची निमंत्रण पत्रिका दिली. तसेच २०२५ नूतन वर्षाची विद्यापीठाची दैनंदिनी डायरी देखील भेट दिली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठाच्या विकासाची माहिती कुलगुरू प्रा. महानवर यांच्याकडून जाणून घेतली. कुलगुरू प्रा. महानवर यांनीही विद्यापीठात सुरु असलेल्या विविध उपक्रम आणि प्रकल्पांची माहिती राज्यपाल महोदयांना दिली.