पार्क मैदानावर दि. १ एप्रिलपासून सुरुवात होणार
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : युनायटेड क्रिकेट क्लबच्यावतीने उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्लबचे प्रशिक्षक संजय मोरे यांनी दिली आहे. सदरचे शिबीर पार्क मैदानावरील युनायटेड क्रिकेट क्लबच्या नेटवर इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दि. ७ एप्रिल ते दि. ५ जून २०२६ दरम्यान आणि दहावी व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२६ या कालवधीत सकाळी ६ ते ९.३० आणि दुपारी ३.३० ते ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. सदर शिबिरात प्रसिध्द क्रिकेटपंटूचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिरात प्रशिक्षण देणारे संजय मोरे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची कोचिंग परीक्षा लेव्हल वन पास झालेले एकमेव प्रशिक्षक आहेत. या शिबिरात क्रिकेटच्या प्रत्येक अंगाचा तंत्रशुध्द अभ्यास व माहिती देण्यात येणार आहे.

- फलंदाजीचे तंत्र फ्रंट फुट स्ट्रोक कसा मारायचा, पुल कसा मारायचा,कव्हर ड्राईव्ह,बँक फुट स्ट्रोक कसा मारायचा? याविषयी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे फास्ट बॉलिंगचे तंत्रही शिकविले जाईल.
- चेंडू इनस्विंग कसा करायचा, आऊट स्विंग कसाकरायचा, इन कट कसा करायचा, आऊट कट कसा करायचा यासह स्पिन बॉलिंग, क्षेत्ररक्षणाचे (फिल्डींग) तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- खेळाडूंची शारिरीक तंदुरुस्ती घेतली जाईल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे धडे घेण्यात येतील.
तरी ज्या खेळाडूंना या क्रिकेट शिबिरात सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी पार्क मैदानावरील युनायटेड क्रिकेट क्लबच्या नेटवर क्लबचे सचिव सुनिल मालप (७५७८२१४६८१), सहसचिव संजय मोरे (९८९०८२३३५२), चंद्रशेखर लोखंडे (९९७५७७२७५८), चिराग शहा (९८५०२८१५२०) यांच्याशी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत. त्याचप्रमाणे सदरची नावे सत्यम स्पोटर्स, पार्क स्टेडीयम गाळा नं. १७, अनमोल मिठाईशेजारी सतीश भोसले यांच्याकडे सकाळी १०.०० ते सायं.८.३० या वेळेत नोंदवावीत.