सार्वजनिक न्यासामार्फत नागरिकांना सुलभपणे सेवा मिळण्यासाठी कार्यशाळा

धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, प्रवीण कुंभोजकर, संजय पाईकराव, नितीन भोगे, खतीब वकील यांचे मार्गदर्शन

 अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धर्मादाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वस्तांची कार्यशाळा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश धर्मादाय आयुक्त (मुंबई) अमोघ कलोती आणि धर्मादाय सह आयुक्त (पुणे) यांच्या निर्देशानुसार नागरिकांना सेवा सुलभ करण्याचा होता.

यावेळी धर्मादाय उप आयुक्त प्रवीण कुंभोजकर, सहायक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव, मानसशास्त्र तज्ञ डॉ. नितीन भोगे, जिल्हा अध्यक्ष खतीब वकील आणि अन्य विधि तज्ञ उपस्थित होते. उप आयुक्त कुंभोजकर यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, “मुख्यमंत्र्याच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुलभ करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.” त्यांनी कायदेविषयक अडचणींवर मार्गदर्शन केले.

डॉ. नितीन भोगे यांनी मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. खतीब वकील यांनी विश्वस्तांचे अधिकार, कर्तव्ये आणि संस्थांचे संगोपन याबाबत माहिती दिली. ॲड. अंबादास रायनी आणि ॲड. खोले यांनी संबंधित कायद्यांवर मार्गदर्शन केले. सहायक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव यांनी दस्तऐवज अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या. कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये विश्वस्तांच्या शंका समाधान करण्यात आल्या.या कार्यशाळेतून विश्वस्तांना आवश्यक माहिती व कौशल्ये याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले. त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढून संस्थांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी चालना मिळणार आहे.  अशा संस्थामार्फत सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सेवा अत्यंत सुलभ रितीने मिळतील. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *