सोलापुरात विश्वतांसाठी २७ मार्चला कार्यशाळा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : विश्वतांसाठी सोलापुरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती ( धर्मादाय सह आयुक्त, पुणे ) यांच्या निर्देशननुसार गुरूवार, दि. २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे विश्वतांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती धर्मादाय उप आयुक्त (प्रतिनियुक्त न्यायाधीश) प्रविण अ. कुंभोजकर यांनी दिली आहे.
सदर कार्यशाळेत संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये विश्वतांना दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणात विविध तज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडाच्या अनुषंगाने क्षेत्रिय शासकीय व निमशासकी कार्यालयांसाठी १०० दिवसांसाठी ७ कलमी कृति आराखडाप्रमाणे सुकर जीवनमान नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने याचे आयोजन केले आहे . तसेच प्रचिलित कामकाजाच्या पध्दतीचे पुनर्विलोकन करून प्रशासकीय पध्दतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पध्दतीने द्याव्यात. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी सातत्याने प्रयन्त करावेत, या अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी विश्वतांना या कार्यशाळेस जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त, (प्रतिनियुक्त न्यायाधीश) प्रविण अ. कुंभोजकर यांनी केले आहे.