आडत-भुसार व्यापाऱ्यांचा २७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यव्यापी बंद

रविवार दि. १८ ऑगस्ट  रोजी सोलापूर जिल्हास्तरीय व्यापारी परिषद

by assal solapuri||

सोलापूर :   महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ ऑगस्ट २०२४  रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आले आहे, अशी माहिती भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या या एक दिवसीय लाक्षणिक बंदनंतर  संपूर्ण राज्याचे व्यापारी आंदोलनासाठी मुंबई येथे एकत्र येणार आहेत. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री व स्थानिक आमदारांना व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा ठराव सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड (मुंबई), दि ग्रेन राईस अँड ऑइल सीड्स मर्चेंट्स असोसिएशन (मुंबई) व दि पुना मर्चेंट्स चेंबर (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्यातर्फे रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दी पुना मर्चंट चेंबर, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले होते. सदर परिषदेत ठरल्याप्रमाणे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्याचे व्यापारी आंदोलनासाठी मुंबई येथे एकत्र येतील. तत्पूर्वी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री व स्थानिक आमदारांना व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा ठराव सादर करण्यात येईल. त्यानिमित्त रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर जिल्हास्तरीय व्यापारी परिषद आयोजित केले आहे.

या परिषदेस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष जितेंद्र शहा, चेंबर ऑफ महाराष्ट्रा असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे  दिपेन अगरवाल, दि ग्रेन राईस अँड ऑईल सीड्स मर्चेंट असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष भीमजी भानुशाली  आदी वरिष्ठ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या पत्रकार परिषदेस भुसार आडत व्यापारी संघाचे सेक्रेटरी वैभव बरबडे, उपाध्यक्ष अशोक संकलेचा, खजिनदार गुरुशांत ढंगे, आडत व्यापारी सिद्धय्या स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

 या विशेष बाबींवर होणार चर्चा..

या परिषदेत प्रामुख्याने अन्नधान्याला जीएसटी लागू झालेला असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन (सेस) रद्द झाला पाहिजे. लीगल मेट्रोलॉजी कायदा नियम ३ मधील प्रस्तावित बदल करू नये. जीएसटी कायदा सुटसुटीत करावा. दरमहा रिटर्नची संख्या कमी करावी .खरेदीवरील सेटऑफ संबंधी मागील अडचणी दूर कराव्यात. यासह  इतर अनेक अडी-अडचणी विशेष बाबींबर चर्चा होणार आहे. या वरील मागण्यांच्या समर्थनार्थ दि. २७ ऑगस्ट २०२४  रोजी लाक्षणिक बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्याची पूर्वतयारी म्हणून रविवार, दि. १८ ऑगस्ट २०२४  रोजी सोलापूर जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *