BRATUKAMMA FESTIVAL:  ब्रतुकम्मा’ खेळूया, आकर्षक साड्या जिंकूयात!

Various competitions organized for Telugu speaking women on the occasion of Navratri- Bratukamma festival

तेलुगू भाषिक महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त ब्रतुकम्मा महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 

अस्सल सोलापुरी ||

(BRATUKAMMA FESTIVAL HELD IN SOLAPUR) सोलापूर : श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन व पद्मशाली सखी संघमच्यावतीने (Shri Markandeya Social Foundation and Padmashali Sakhi Sangham) सोलापुरातील तेलुगू भाषिक महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त ‘ब्रतुकम्मा महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवादरम्यान अष्टमीला म्हणजेच मंगळवार, दि.30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 8 यावेळेत ब्रतुकम्मा सर्वोत्कृष्ट सजावट आणि महिलांसाठी सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा  स्पर्धेचे आयोजन करण्यात  आले आहे. अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश सरगम व सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, उपाध्यक्षा लक्ष्मी यनगंदूल, सचिवा रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिले आहे.  ब्रतुकम्मा ही स्पर्धा पोलीस मुख्यालय जवळील, व्हिवको प्रोसेससमोर असलेल्या ‘श्री मार्कंडेय उद्यान’ (बाग) होणार आहे.

सोलापुरातील (Telugu speaking women) तेलुगू भाषिक महिला नवरात्री उत्सवामध्ये अष्टमीला ‘ब्रतुकम्मा’ साजरा करण्याची परंपरा आजही कायम जोपासत आहेत.  विविध फुले एकत्र करुन मनोरासारखे सजवून मध्यभागी हळदीच्या सहाय्याने श्री गौरीदेवी (श्री गौरम्मा) बनवून तिचे मनोभावे विधीवत पूजा करुन ‘ब्रतुकम्मा’ भोवती फेर धरत लोकगीते म्हटली जातात. सोलापुरात अष्टमीलाच  विविध फुलांने  ‘ब्रतुकम्मा’ तयार करण्याची परंपरा आहे. तेलंगणा राज्यात आजही नऊ दिवस मुली, युवती आणि महिला एकत्र येऊन ‘ब्रतुकम्मा’ भोवती फेरा धरतात. नऊ दिवसांसाठी नऊ नांवे आहेत.

  • सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन व पद्मशाली सखी संघमच्यावतीने तेलुगू  भाषिक महिलांसाठी आपली संस्कृती, परंपरा आपल्या हातात.! या अनुषंगाने ब्रतुकम्मा भोवती फेर धरत सर्वोत्कृष्ट पारंपरिक नृत्य करणा-या एकूण ५ महिलांना आकर्षक साड्या बक्षीसाच्या स्वरुपात देण्यात येणार आहे.

  • ‘सर्वोत्कृष्ट ब्रतुकम्मा सजावटी’साठी एकूण ३ आकर्षक साड्या पारितोषिके म्हणून दिले जाणार आहेत. ‘पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषा’ करणा-या एकूण ३ महिलांना आकर्षक साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. सोलापुरातील नामवंत असलेल्या चाटला पैठणी सेंटरतर्फे या सध्या भेट देण्यात येणार आहे.

  •  जगातील लोकसंख्यानुसार झाडे कमी प्रमाणात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. रोपे कसे लावावेत? त्यांची संगोपन कसे करायचे? आधीबाबतीत पुणे येथील हरित मित्र परिवाराचे प्रमुख डॉ. महेंद्र घागरे हे मार्गदर्शन करणार आहेत.

  •  तेलुगू  भाषिक महिलांना त्यांच्या ‘कर्तृत्वाला उभारी’ देण्यासाठी लवकरच ‘तेलुगुवारी रुचुलू’ (तेलुगुजणांचे स्वाद) फूड फेस्टिव्हलचे  योजन करण्यात येणार आहे. फक्त तेलुगू  भाषिक महिलांसाठीच या स्पर्धा असणार आहेत.

कार्याध्यक्षा सविता येदूर

तरी  इच्छुकांनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा ((9021551431) यांच्याशी संपर्क साधावेत. ब्रतुकम्मा उत्सवात जास्तीत जास्त तेलुगू  भाषिक महिलांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन फाऊंडेशन व सखी संघमचे  सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *