बालेवाडी, पुणे येथे दि.२५ एप्रिल ते ४ मे २०२६ दरम्यान स्पर्धेचे आयोजन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी सोलापूरच्या चौघांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या संघामध्ये 55 वर्ष वयोगटात डॉ. नीलकंठ पोतदार, ५० वर्षे वयोगटामध्ये मनीष रावत, ४५ वर्ष वयोगटामध्ये अनंत कुलकर्णी यांची तर ४० वर्षे वयोगटामध्ये विनोद मगजी यांची निवड झाली आहे. या स्पर्धा दि. २५ एप्रिल ते ४ मे २०२६ दरम्यान होणार आहेत.

ही निवड सन २०२५ सालामध्ये झालेल्या सहा राज्य मानांकित स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर करण्यात आली आहे. या विविध स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे ते सर्वजण या आगामी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यांच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान. सचिव झेड. एम. पुणेकर यांनी अभिनंदन केले आहे.