सोलापूर जिल्हा मानांकित खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे बक्षीस वितरण

स्व. सुभाष भालचंद्र बुबणे यांच्या स्मरणार्थ आयोजन

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पार्क स्टेडियमवरील मुळे पवेलियन हॉल येथे स्व. सुभाष भालचंद्र बुबणे यांच्या स्मरणार्थ  खुल्या टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, हर्षवर्धन बुबणे व सचिव झेड. एम. पुणेकर,के.टी. पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झेड. एम. पुणेकर, गोवर्धन आवशक,  सिद्रामआप्पा मुनोळी यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेत बार्शीच्या वेदांत खळदेने उल्लेखनीय खेळ पुरुष एकेरी आणि १७ वर्षे वयोगटात अजिंक्यपद पटकावले आहे. राजवर्धन तिवारी हा दुहेरी मुकुटचा मानकरी ठरला.  त्याने अकरा व १४  वर्षे वयोगटात अजिंक्यपद प्राप्त केले आहे. त्याने महाराष्ट्र मानांकित स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना रौप्यपदक पटकावल आहे.  त्यानिमित्त हर्षवर्धन बुबणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत ११  वर्षे वयोगटात  बार्शीच्या राजवर्धन तिवारीने  केएलईच्या रियान बोलेचा तीन शून्यने पराभव केला. तसेच त्याने १४ वर्ष वयोगटात वीरेन मालवेचा तीन शून्य अशा फरकाने विजय नोंदवला आहे. मुलींच्या गटात अमृता आंबेसंगे हिने जीवनी धारणेवर तीन एक असा विजय मिळवला आहे. १४ वर्षे मुलींच्या गटात शिवानी सानपने शांभवी सोलापुरेवर तीन शून्य अशा फरकाने विजयाची नोंद केली आहे. १७  वर्षे वयोगटात वेदांत खळदेनं सुजित खुरंगळेवर तीन एक अशा फरकाने विजय मिळवला. मुलींमध्ये वेदांकिता पाटीलने अनुष्का रावतवर तीन एकने विजय मिळवला.

महिला एकेरीत अनुष्का रावतने वेदांकिता पाटीलचा तीन दोन अशा फरकाने विजयाची नोंद केली आहे.  पुरुष एकेरीमध्ये वेदांत खळदेन विनोद मगजीवर तीन शून्य अशा फरकाने विजय मिळवला. प्रौढ एकेरीत आनंद नवलेने सुभाष उकरंडेवर तीन एक अशा फरकान विजय मिळवला.  १७  वर्षे वयोगटात अनुष्का रावतची फटकेबाजी आणि तिच्या फनी रबरापुढे वेदांतिका पाटीलचं टिकाव लागू शकल नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *