अरुण, सुकळे प्रशालेत विद्यार्थ्यांनी घेतला स्नेह भोजनाचा आस्वाद

अरुण, सुकळे प्रशालेत विद्यार्थ्यांनी घेतला स्नेह भोजनाचा आस्वाद

सोलापूर : प्राथमिक शाळा व कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत शिक्षण सप्ताहाअंतर्गत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२४ पर्यंत शिक्षण सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. त्याप्रसंगी प्रत्येक संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकांचा अवलंब न करता इतर खेळ तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अभ्यासात केले पाहिजे, अशी सूचनाही देण्यात आली.

  • सोमवारी (दि. २२) अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मंगळवारी (दि. २३) मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, बुधवारी (दि . २४) क्रीडा दिवस राबविण्यात आला. गुरुवारी (दि. २५) सांस्कृतिक दिवस, शुक्रवारी (दि. २६) कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, शनिवारी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब व शालेय पोषण दिवस तर रविवारी (दि. २८) समुदाय सहभाग दिवस राबविण्यात आला. या शिक्षण सप्ताहांतर्गत रविवारी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन हा उपक्रम सहभागातून राबविण्यात आली. सर्वप्रथम सुनील नगरपरिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घोषवाक्याचे फलक तयार केले होते.
    आता चालवा एकच चळवळ, लावा वृक्ष करा हिरवळ, नसेल वृक्ष तर जीवन रुक्ष, झाडे आहेत कल्पतरू, संरक्षण त्यांचे नित्य करु. होऊ आपण सर्व एक, चला लावू रोपे अनेक. वृक्ष लावा, पाऊस वाढवा. जेथे झाडे उदंड, तेथे पाऊस प्रचंड. घोषणा देत पालकांचे लक्ष वेधून घेतले. रविवारी शाळेतील चंद्रशेखर गुंजले यांनी विद्यार्थ्यांना गोड पदार्थाचे नियोजन करून विद्यार्थ्यांचे मन आनंदित केले, अशा पद्धतीने शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सचिव विजयकुमार चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी केलेल्या कला कुसरांचा कौतुक केला. यावेळी समुदायातील गृहिणींना बोलवून त्यांना वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करावा, शिक्षणाच्या नवीन गोष्टी स्वीकाराव्यात असे सांगितले.यावेळी मुख्याध्यापक राचप्पा मिराकोर मुख्याध्यापिका सौ अंबुबाई पोतू मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नितीन दणाणे यांनी केले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *