थायलंडच्या थासापोर्न नाकलो-बुन्यावी थामचैवत यांना दुहेरीचे विजेतेपद

                                ओअॅसिस सोलापूर ओपन एमएसएलटीए – एसडीएलटीए                                  २५ हजार डॉलर महिला आयटीएफ टेनिस स्पर्धा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  महिलांच्या २५ हजार डॉलर बक्षिसांच्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये थायलंडच्या बुन्यावी थामचैवत हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत थायलंडच्या थासापोर्न नाकलो व बुन्यावी थामचैवत यांनी विजेतेपद पटकावले आहे.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व ओअॅसिस, प्रिसीजन, इलिझियम- जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत ओअॅसिस सोलापूर ओपन एमएसएलटीए-एसडीएलटीए स्पर्धा  एम. एस. एल. टी. ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सुरू आहेत.

  •  या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या लढतीत भारताच्या पाचव्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने गतवर्षीच्या विजेत्या भारताच्या दुसऱ्या मानांकित सहजा यमलापल्लीचा ६-३,६-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
  • दुसऱ्या उपांत्य फेरीत थायलंडच्या बुन्यावी थामचैवतने कझाकिस्तानच्या चौथ्या मानांकित झिबेक कुलंबायेवाचा ६-१,६-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
  • दुहेरीत अंतिम फेरीत थायलंडच्या थासापोर्न नाकलो हीने बुन्यावी थामचैवतच्या साथीत भारताच्या आकांक्षा नित्तूरे व सोहा सादिक यांचा ६-४,६-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक व १ लाख २८ हजार रुपये, उपविजेत्या जोडीला करंडक व ७४ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, प्रिसिजनच्या संचालिका मयुरा शहा यांच्या हस्ते क्रिस्टल चषक प्रदान करण्यात आला.

  • स्पर्धेचा निकाल : मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: महिला:
  • श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत) [५] वि.वि. सहजा यमलापल्ली (भारत) [२] ६-३, ६-१;
  • बुन्यावी थामचैवत(थायलंड)वि.वि.झिबेक कुलंबायेवा(कझाकस्तान) [४] ६-१, ६-४;
  •      दुहेरी: अंतिम फेरी:
  • थासापोर्न नाकलो(थायलंड)/ बुन्यावी थामचैवत(थायलंड)वि.वि.आकांक्षा नित्तूरे(भारत)/सोहा सादिक(भारत) ६-४, ६-२.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *