ऑनलाईन प्रणालीचे प्रशिक्षण तज्ञ प्रविण बानावलीकर यांनी केले मार्गदर्शन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशालेतील मुळे पॅव्हेलियन हॉल येथे ऑनलाईन प्रणालीचे प्रशिक्षण तज्ञ प्रविण बानावलीकर यांनी क्रीडा शिक्षकांच्या विविध अडी-अडचणी, शंका-कुशंका, विविध प्रश्नांचे समाधानकारक निरसन केले. या जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विविध शाळा- कनिष्ठ महाविद्यालयातील १५० हून अधिक क्रीडा शिक्षकांसह क्रीडाधिकारी कार्यालातील क्रीडाअधिकारी, कर्मचारीवृंद उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ च्या आयोजनासाठी क्रीडा शिक्षकांसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.

सोलापूर जिल्हयातील शाळा- कनिष्ठ महाविदयालयातील ज्या क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन प्रणाली संबधिती कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती आणि ज्या क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन प्रणालीमध्ये खेळाडूंची माहिती भरताना अडचण येत होती अशा सर्व क्रीडा शिक्षकांच्या शंका-समाधानाचे निरसन करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, ऑनलाईन प्रणालीचे प्रशिक्षण तज्ञ प्रविण बानावलीकर, क्रीडाधिकारी नईम शेख, नदीम शेख, सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संतोष खेंडे, सुहास छंचुरे, प्रमोद चुंगे, शिवानंद सुतार, राजाराम शितोळे, वीरेश अंगडी, शिवानंद बोधले, विश्वास गायकवाड,उज्वल मलजी, आरती मालजी,शिवानंद बोधले, राजकुमार माने, उदय वगरे, झानेश्वर काळे, धर्मराज कट्टीमनी, मीरा गायकवाड, हरीभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर सर्वगोड, शांतप्पा कुंभार, सत्येन जाधव, अक्षय माने, अक्षय गवळी, सचिन गाडेकर, दादासाहेब म्हमाणे, सचिन धवन, रतिकांत म्हमाणे, निखील गोडसे, समर्थ मनूकर, सुवर्णा कांबळे, श्रीधर गायकवाड प्रबुद्ध चिंचोलीकर यांच्यासह विविध शाळा- महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

