विशेष संपादकीय…
अपेक्षांच्या बोझ्याखाली….

अपेक्षांचं ओझं “प्र”भारी “टीम लीडर”ना पेलवेल का?
अपेक्षांचं ओझं “प्र”भारी क्रीडाधिकार्यांना पेलवेल का? हा एक सध्यातरी एक निरुत्तरित अशा प्रश्न विविध खेळ आणि खेळाडूंसमोर उभं आहे. त्याचं कारणही असंच आहे. आता लवकरच विविध शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आगामी होणार्या जवळपास विविध वयोगटातील ४९ हून अधिक शालेय खेळांच्या स्पर्धा, त्याचं नीटनेटक नियोजन, यशस्वी आयोजनासाठीच्या जोरदार हालचाली करणे गरजेचे आहे. मात्र स्पर्धा कार्यक्रम जाहीर झाला आणि स्पर्धा लवकरच सुरु होतील, यात काही शंका नाही.
या संपूर्ण पार्श्वभूमीचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. ऐन शालेय क्रीडा स्पर्धांचं नियोजन-आयोजन करण्याची जेंव्हा खरी गरज होती, त्यावेळी ऐन मोक्याच्याप्रसंगी ज्याला आपण खेळातील टीम लीडर म्हणतो, त्याचं नाट्यमयरित्या दिल गेलेलं राजीनामा सत्र. संपूर्ण सोलापुरातील क्रीडा खाते आणि खेळाला हा एक जबर धक्का म्हणा अथवा नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी नक्कीच
अवस्था सोलापुरातील तमाम क्रीडा विभागाचं अस झालं असाव. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, आता मोसम-हंगाम सुरु होतोय शालेय क्रीडा स्पर्धांचं. ऑगस्ट ते साधारणपणे डिसेंबर असे संपूर्ण सत्र क्रीडा स्पर्धांनी व्यस्त असत. खेळाडू, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालय,क्रीडा शिक्षक, विविध खेळांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक, क्रीडा खाते, क्रीडा प्रशासन, क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडाधिकारी, सोलापूर महानगरपालिका क्रीडाधिकारी याचं व्यस्त कार्यक्रम आणि बिझी शेड्यूल असत. अशा परिस्थितीत या शालेय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? सोलापुरात विविध खेळ आणि त्याच्या नियोजन-आयोजन हे सगळकाही विविध संघटना, शाळा, महाविद्यालय, स्थानिक क्लब, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच, तज्ञ, जाणकार, क्रीडा शिक्षकांसह संबंधित दोन्ही कार्यालयातील क्रीडाधिकारी, संबंधित स्टाफ यांच्यामार्फत सांघिक आणि सहचर्य भावनेतून होत असते. ते तसे झालेही पाहिजे. यात दुमत नाही.

मुळात प्रश्न हाच आहे की, याची खरी आणि नेमकी जबाबदारी काय? कोणाची? आणि कशी असावी. केवळ सांघिक, सहकार्य आणि सहचर्य या भावनेतून हे जणूकाही सध्या सुरु झालेलं आहे. जवळपास ४९ हून अधिक खेळांच्या विविध शालेय, जिल्हा, तालुका, राज्य आणि विभाग अशा विविध स्पर्धा नियोजन- आयोजन अशा भरगच्च आणि व्यस्तता असलेल्या संपूर्ण क्रीडा विभाग,क्रीडा शिक्षक आणि खात्यासाठी जणूकाही कसोटीच असत. अशावेळी शहर आणि ग्रामीणच्या क्रीडा शिक्षकांच्या बैठका झाला. यात सोलापुरात क्रीडा शिक्षकांच्या हितार्थ झटणाऱ्या, लढणाऱ्या लढवय्या अशा कार्यरत विविध क्रीडा संघटनांची भूमिकादेखील फार महत्वाची असते. होती आणि ते त्यांनी सांघिक आणि सहचर्य भावनेतून व्यक्तही करून दाखवलं. संघटनेची ही भूमिका प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजन-आयोजन यासाठीच क्रीडा खात-विभाग आणि स्थानिक क्रीडा प्रशासनांनी तशी बैठक घेतली. ही बैठक घेतली खरी. परंतु, अनेक प्रश्नांना फाटा देऊन गेली. खेळांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब होती ती महापालिका क्रीडा अधिकाऱ्यांचा अचानक राजीनामा देण. असो, तो त्यांचा हा निर्णय वैयक्तिक पातळीवरील असेल. त्यांना दोष देणे कितपत उचित ठरेल. समस्या अथवा मुद्दा महापालिका क्रीडा अधिकाऱ्यांचा अचानक राजीनामा हा नव्हे. त्यानंतरच काय? बिलकुल याच उत्तरही मिळाल. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा प्रशासन यांच्यावतीन बैठकाही झाल्या. आगामी योजनाही आखल्या गेल्या. तसे नियोजनही केलं गेल. पण, परंतु, किंतु, अशा अनेक सवाल आजही खेळ-खेळाडू, खेळाशी संबधित व्यक्ती, क्रीडा शिक्षक शेवटी आमच हक्काच अस व्यासपीठ “आमच असंख्य असं वाचकवर्ग” यांनातरी समाधानकारक उत्तर द्यावच लागणार.
कारण खेळ आणि खेळाशी निगडीत जबाबदार अशी पहिली व्यक्ती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व क्रीडा शिक्षक आणि सर्वानांच आगामी शालेय शहर आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या सर्व क्रीडा शिक्षकांच्या मदतीने, सहाय्याने पार पाडतील असे जाहीर करून टाकले. ती त्यांची कदाचित नैतिक जबाबदारी असावी? आणि त्यांनी क्रीडा शिक्षकांना यशस्वी आयोजनाचे आवाहनही केले. ते त्यांनी योग्यच केलं. कारण या स्पर्धा खूपच विस्तारित, वेळखाऊ, खुपवेळ चालणाऱ्या, भव्य, व्यापक विशाल स्वरूपाच्या असतात. आपणही नैतिक जबाबदारी समजून त्यांच्या मदतीच्या आवाहनाला सादही दिला. ही एक सहकाऱ्याची भूमिका योग्य अशीच होती. परंतु, शेवटी सवाल प्रश्न तोच? अशा व्यापक स्पर्धेसाठी क्रीडा प्रशासनाकडून दोन्ही क्रीडा कार्यालये सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर महानगर पालिका क्रीडा अधिकारी कार्यालय आणि त्यांचा अपुरा-तुटपुंजा जेमतेम असा दोन-तीन व्यक्तींचा स्टाफ. अशातच महापालिका क्रीडा अधिकाऱ्याचा राजीनामा आणि त्यांच्यामार्फत नव्याने नियुक्त प्रभारी सोलापूर महानगरपालिका क्रीडाधिकारी. यांनीही सर्वांकडून सहकाऱ्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसे आपण त्यांना संपूर्ण सहकार्यही करूयात.
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे आम्ही सोलापूरकर आणि सोलापुरातील तमाम क्रीडा-खेळ-खेळाडू यांच्यासाठी झटणारे क्रीडा शिक्षक-मार्गदर्शक, संघटक, पंच, विविध क्रीडा संघटना नक्कीच याकामी सहकार्य करणार.
पुन्हा एकदा नव्हे तर जेव्हा कधी अशी वेळ-प्रसंग येईल, गरज पडेल तेव्हा सोलापूरचा होतकरू, कष्टकरी, ध्येयवेढा, ध्येयवादी असा खिलाडूवृत्ती, खेळभावना जोपासणारा आमचा क्रीडा शिक्षक सदैव खंबीरपणे पाठीशी उभा राहील. हे आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो.

आमचा तमाम क्रीडा क्षेत्राला सवाल?
-
आगामी शालेय क्रीडा स्पर्धा कोणत्याही व्यत्ययाविना सुरळीतपणेपार पडतील का?
-
नूतन सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकाऱ्यांना शालेय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी मदत मिळेल का?
-
अपुऱ्या आणि तुटपुंजा मनुष्यबळ, अशा विषम परिस्थितीत सोलापुरातील तमाम क्रीडा क्षेत्र-विभाग, प्रशासन या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू शकतील का?
-
विविध शाळा-महाविद्यालये, संस्था आणि त्यांचे क्रीडा क्षेत्राशी संबधित व्यक्ती, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, कोच, खेळाडू, क्रीडाप्रेमी यांच याकामी सहकार्य राहणार अथवा मदत मिळणार का?
-
असे अनेक प्रश्न अद्यापही आहेत. परंतु या सर्वांना बगल देत यशस्वीतेसाठी सांघिक प्रयत्न होईल का?
-
भिजत घोंगडं हा विषय बाजूला सारू यात.