अमर पाटील म्हणाले; दक्षिणसाठी दावेदारी, मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच

मात्र  बंडखोरी अजिबात करणार नाही: अमर पाटील यांचा दावा

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, आपली दावेदारी राहणार असून, अंतिम निर्णय मात्र पक्षश्रेष्ठींचाच राहणार आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपणास मान्य असेल, मात्र आपण बंडखोरी अजिबात करणार नाही, असा दावा करीत  शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब गट) जिल्हाप्रमुख अमर रतिकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

येत्या गुरुवारी (१२ सप्टेंबर २०२४) दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत हे उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अमर पाटील बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला आहे. यातून आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करणार असून, मोट बांधणार आहे. त्यादृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्वपूर्ण राहणार असल्याचे अमर पाटील म्हणाले.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते गुरुवार, दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी  जुळे सोलापुरात अमर पाटील यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्गाटन होणार आहे. गतवेळी शिवसेनेची भाजपसोबत युती होती. त्यामुळे आम्हाला दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी संधी मिळू शकली नाही. मात्र यंदा आपण उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागणार आहोत. आपणालाच उमेदवारी मिळणार आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य असून, आम्ही कोणत्याही प्रकारची बंडखोरी करणार नाही. आमचे वडील रतिकांत पाटील हे देखील शिवसेनेचे दक्षिणमधील आमदार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणला शिवसेनेचा आमदार मिळाला होता. दक्षिण सोलापूर तालुका हा शिवसेनेसाठी पोषक आहे. त्यामुळे आपण आता दक्षिणमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, आपण पक्षश्रेष्ठींकडे दावेदारी करणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *