सुमित फुलमामडी, किरण लोंढे समृद्धी नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : समृद्धी कला मंचच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण; प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मयुरवन हॉटेल हॉल मध्ये समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचची नवीन कार्यकारिणी चंद्रकांत होळकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली. यानिमित्त नाट्य सेवेतील कार्याबद्दल सुमित फुलमामडी, किरण लोंढे यांना समृद्धी नाट्य सेवा पुरस्कार 2025 मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी चंद्रकांत होळकर, मल्हारी बनसोडे, कृष्णकांत चव्हाण, सुमित फुलमामडी, किरण लोंढे उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये समृद्धी कला मंचचे संस्थापक तथा प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी वर्षभरामध्ये राबवण्यात येणारे कार्यक्रम, उपक्रम व कार्यकारिणीची रचना या विषयी सविस्तर माहिती दिली. सुमित फुलमामडी व किरण लोंढे यांचे गौरवपर मानपत्र पुंडलिक कलखांबकर यांनी वाचून दाखवले. या सहविचार सभेमध्ये कला व नाट्य क्षेत्राला अनुसरून किरण लोंढे, सुमित फुलमामडी, कृष्णकांत चव्हाण, मल्हारी बनसोडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पुंडलिक कलखांबकर, आभार प्रदर्शन डॉ. माधुरी भोसले यांनी केले.

समृद्धी कला मंचची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष : कृष्णकांत चव्हाण
- उपाध्यक्ष (प्रशासन) : मल्हारी बनसोडे
- (उपक्रम) : सुमित फुलमामडी
- ( उपक्रम) : किरण लोंढे
- प्रमुख कार्यवाह : संजय सावंत
- सहकार्यवाह( प्रशासन) : हिरालल धुळम
- सहकार्यवाह( उपक्रम) :पुंडलिक कलखांबकर, श्रीमंत कोळी
कार्यकारिणी सदस्य :
मल्लिनाथ निंबर्गी, रेणुका बुधाराम, डॉ. माधुरी भोसले, अर्चना कलखांबकर, मल्लिकार्जुन सोमेश्वर, जितेश कुलकर्णी, अनिल खरटमल, बालाजी चव्हाण.
विशेष निमंत्रित सदस्य : गोवर्धन कमटम, प्रशांत बडवे, बसवराज मठपती, अरविंद मोटे
सल्लागार : चंद्रकांत होळकर, रमेश बसाटे.
