श्री कॉम्प्युटर्समध्ये मुली-महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण
By assal solapuri||
सोलापूर : रामलाल चौकातील श्री कॉम्प्युटर्समध्ये शहरातील मुली व महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत
एमएससीआयटी, टॅली, बँकिंग (MS-CIT, TALLY, BANKING) आदींचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मोफत कोर्ससाठी फॉर्म भरून प्रवेश देणे सुरु आहे. तरी शहरातील महिला व मुलींसाठी मोफत कॉम्पुटर कोर्ससाठी आधार कार्ड, दहावी मार्कलिस्ट, रेशन कार्ड ( पिवळे, केशरी),एक फोटो अशी कागदपत्रे लागणार आहेत . मोजक्याच जागा शिल्लक असून, वरील कागदपत्रासह त्वरित भेट द्यावेत . अधिक माहितीसाठी श्री कॉम्प्युटर्स :रामलाल चौक, सोलापूर येथे (मो.९८५०६६६५०१, ७५८८६१०६८८) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे .