अमृतेश्वर शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन: आषाढ मास शिव महापुराण : श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, एस.एस. साबळे वीरशैव ट्रस्टचा उपक्रम
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मानवी जीवन हे चिंतनासाठी आहे, चिंतेसाठी नव्हे, असे आशीर्वचन श्री अमृतेश्वर शिवाचार्य (जिंतूर) महास्वामीजीनी केले.
श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, एस.एस. साबळे वीरशैव एस.एस.साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्यावतीने आषाढ मासनिमित्त शिवानुभव मंगल कार्यालय येथे शिव महापुराणकथेप्रसंगी अमृतेश्वर शिवाचार्य यांचे आशीर्वचन झाले. तिसऱ्या पुष्पाचे प्रारंभ श्री सिद्धेश्वर वेदपाठ शाळेतील बटूंच्या वेदघोषाने झाला. श्री विरभद्र शिवाचार्य स्वामीजी (कडगंची) यांच्या उपस्थितीत श्री व सौ रेखा विलास स्वामी, शिला राजशेखर हिरेमठ, शोभा राजशेखर कोले, रेणुका शिवाजी कराळे या दाम्पत्यांकडून शिव महापुराण ग्रंथाचे पूजनाने शिव महापुराण कथेचा प्रारंभ झाला.

श्री अमृतेश्वर शिवाचार्य (जिंतूर) महास्वामीजी म्हणाले…
करंटा जन्माला आला तरी शिवभक्तीने मोक्ष प्राप्तीच्या वाटेवर जातो. भगवान शिवाचा भक्त आपल्या जीवाला शिव करत असतो. आई-वडिलांच्या पोटी करंटा जन्माला आला तरी त्याच्या निश्चय शिव भक्तीने मोक्ष प्राप्तीप्रत जातो. मन्मथ माऊली हे संत शिरोमणी माऊली झाले. शिवपद प्राप्त केले.
- भस्म: भस्म हे गायीच्या शेणातून तयार होते. भस्म कपाळाला धारण केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. मोक्षप्राप्ती होते. आपले जीवन कृतर्थ होते.
- शिवपुराणात उल्लेख: शिवपुराणात, भस्म हे ‘सृष्टीचा सार’ असल्याचे सांगितले आहे. महादेवाला भस्म फार प्रिय आहे, कारण भस्म हे भौतिक जगाच्या नश्वरतेचे आणि मृत्यूचे प्रतीक आहे.
- नश्वरतेचे प्रतीक: भस्म हे सर्व गोष्टींच्या अंताचे आणि नाश होण्याचे प्रतीक आहे. यामुळे, महादेवाला भस्म प्रिय आहे. कारण ते जगाच्या नश्वरतेची आणि मृत्यूची आठवण करून देते.
- वैराग्याचे प्रतीक : भस्म हे वैराग्य आणि संन्यासाचे प्रतीक आहे. महादेव नेहमी भस्म धारण करतात, जे दर्शवते की ते भौतिक जगापासून अलिप्त आहेत.
- शुद्धीकरणाचे प्रतीक: भस्म हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की भस्म शरीरावर लावल्याने सर्व नकारात्मकता आणि वाईट विचार दूर होतात.
- सृष्टीच्या उत्पत्ती आणि लयचे प्रतीक: भस्म हे सृष्टीच्या उत्पत्ती आणि लयचे प्रतीक आहे. भस्म हे सर्व गोष्टींच्या अंताचे आणि शेवटी राखेत रूपांतरित होण्याचे प्रतीक आहे.
- रोगप्रतिकारशक्ती: भस्म शरीरावरील त्वचेच्या छिद्रांना बंद करते. ज्यामुळे त्वचेचे रोग आणि वातावरणाचा त्रास कमी होतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
- नैसर्गिक संतुलन: भस्म नैसर्गिकरित्या शरीराचे तापमान नियंत्रित करते. ज्यामुळे उन्हाळ्यात उष्णता आणि हिवाळ्यात थंडी कमी लागते, असे मानले जाते.
- भस्म लावण्याचे पापांपासून मुक्ती: भस्म अंगाला लावल्याने अनेक जन्मांचे पाप धुतले जातात, असे मानले जाते.
- आरोग्य: भस्म अंगाला लावल्याने आरोग्य सुधारते, असे मानले जाते. नकारात्मक ऊर्जा कमी:भस्म नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते.
- आत्मिक शांती :भस्म अंगाला लावल्याने आत्मिक शांती आणि स्थिरता मिळते.
- एकंदरीत, महादेवाला भस्म प्रिय आहे. कारण ते भौतिक जगाच्या नश्वरतेचे, वैराग्याचे, शुद्धीकरणाचे आणि सृष्टीच्या उत्पत्ती-लयचे प्रतीक आहे. भस्म धारण केल्याने त्रिवेणी संगम नदीत स्नान केलेले पुण्य प्राप्त होतो. ज्या गोमाताच्या शेणाने घराच्या अंगण सारवले जाते त्या घरात लक्ष्मी वास करीत असते. कामधेनू, संताची सेवा-पूजा केल्याने कुटुंबाच्या उद्धार होतो.
“गोमय वसते लक्ष्मी” चा अर्थ:
धार्मिक महत्व: धार्मिक कार्यांमध्ये शेणाचा वापर केला जातो. अनेक घरांमध्ये शेणाने लिंपण केले जाते. तसेच शेणाचा वापर होम-हवनमध्येही केला जातो.
“गोमय (शेण) हे लक्ष्मीचे रूप आहे” असे मानले जाते. कारण गायीच्या शेणाचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. शेण खत म्हणून उपयोगी आहे. ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. शेणाचा उपयोग धार्मिक कार्यांमध्येही केला जातो. त्यामुळे, ‘गोमय’ (शेण) हे ‘लक्ष्मी’ (समृद्धी) चे रूप आहे, असे मानले जाते.
यावेळी वैदिक मंडळाचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री-होळीमठ, अध्यक्ष बसवराज पुराणिक, कल्लय्या शास्त्री गणेचारी, प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, प्राचार्य गजानन धरणे, कार्तिक स्वामी, नंदकुमार हिरेमठ, प्रा. विद्यानंद स्वामी, गिरी स्वामी यांच्यासह सर्व वैदिक वृंद उपस्थित होते.
