अमृ्तेश्वर शिवाचार्य स्वामीजींच्या रसाळ वाणीतून शिवमहापुराण कथेस प्रारंभ

वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, एस.एस.साबळे वीरशैव ट्रस्टचा उपक्रम

 

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : श्री सिद्धेश्वर वैदिक संस्कृत पाठ शाळेच्या विद्यार्थ्यांचा वेद्घोषानंतर अमृ्तेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या रसाळ वाणीतून अतिशय भक्तिमय वातावरणात शिवमहापुराण कथेस प्रारंभ झाला.

शिवनुभव मंगल कार्यालय येथे श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सोलापूर यांच्यावतीने आणि एस.एस.साबळे वीरशैव ट्रस्ट यांच्या सहकार्याने सकाळी पंचाचार्य ध्वजारोहण आणि कामेश्वर विघ्नेश्वरला रुद्राभिषेक करण्यात आला.

सायंकाळी डॉ पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी (माळकवठा), श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी (नागणसूर),  सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी (शहापूर) यांच्या हस्ते  शिवमहापुराण कथेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बसवराज शास्त्री-हिरेमठ, श्री सिद्धेश्वर यात्रेचे मानकारी राजशेखर हिरेहब्बू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला.

याप्रसंगी वैदिक मंडळाचे संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री-होळीमठ, अध्यक्ष  बसवराज पुराणिक, उपाध्यक्ष कल्लय्या शास्त्री-गणेचारी, सचिव विद्यानंद स्वामी, नंदकुमार हिरेमठ, लिंगय्या स्वामी-खंडाळ, परमेश्वर हिरेमठ, बसय्या स्वामी, शिवानंद स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *