सायली जवळकोटे यांचे निधन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सायली सचिन जवळकोटे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेनऊ वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते ५४ वर्षांचे होते. हैदराबाद रोडवरील यशोधरा हॉस्पिटल येथे त्यांचे निधन झाले.
त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमत या वृत्तपत्रासाठी लिखाण केले. आकाशवाणी आणि आजतक चॅनेलसाठीही त्यांनी काम केले. ‘लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे असा परिवार आहेत.