सोलापूर “RTO” ची दुचाकी वाहनांसाठी  “MH13-EU” नवीन मालिका सुरू

 आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी  आगाऊ अर्ज  करण्याचे आवाहन

 अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||

सोलापूर  : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूरच्यावतीने दुचाकी वाहनांसाठी (MH13-EU)  एम. एच.१३-इयू  ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे.  आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी  दि. ७ एप्रिल रोजी आगाऊ अर्ज  करावेत, असे  आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होत असते.  त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवरचा ताण व नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा.  त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावे.  ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील, त्यांनी संपर्क साधावा.  दि. ७ एप्रिल २०२५  रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान विहीत नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी (केवळ क्र. १६ अन्वये जारी झालेले डी डी), पत्त्याचा पुरावा, आधार लिक मोबाईल नंबर, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा.

सदर डीडी फक्त” Dy R.T.O. Solapur ” यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन व महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९  च्या नियम ४  व ५ “अ” मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.  (उदा. आधार कार्ड, टेलिफोन बील इ.) एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. ७  एप्रिल २०२५  रोजी दुपारी ५ वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येणार आहे.

या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रक्कमेचा डी डी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी (दि. ८  एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत) सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये ३००/- पेक्षा कमी रकमेचा नसावा. सदर डीडी फक्त “Dy R.T.O. Solapur “यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील डीडी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा. दि. ८  एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधित अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल, त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८०  दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा.  अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल. फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. वाहन धारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डी. डी. जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही.

दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक (MH 13 EU) :

  •  दि.७ एप्रिल २०२५ : तिप्पट शुल्कचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे, वेळ – ११  ते  ४ वाजता.
  • दि. ७  एप्रिल २०२५:  सायंकाळी ५ वाजता यादी जाहीर.
  • दि. ८ एप्रिल २०२५ :  दुपारी २ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डोडी स्विकारणे रुपये ३००/- पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे.
  • दि. ८ एप्रिल २०२५: तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी ४ वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *