रमेश मेनकुदळे यांचे निधन
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : येथील रमेश राचप्पा मेनकुदळे यांचे सोमवार, दि. २६ ऑगस्ट २००४ रोजी सकाळच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि सून असा परिवार आहे.
ते सिटी बस डेपो येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते निवृत्त झाले होते. परंतू, त्यांची कामावर असलेली श्रध्दा, चिकाटी आणि अनुभव यामुळे त्यांना पुन्हा सिटी बस डेपो येथे सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी आपली सेवा बजावली होती. सोमवारी सकाळी अचानक त्यांना त्रास होत असल्याने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांनी प्राण गमावली होती. त्यांच्यावर सोमवारी दुपारी दोन वाजता रूपाभवानी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.