नागरकोइल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोइल एक्सप्रेसच्या कोचमध्ये बदल
By assal solapuri|
सोलापूर : नागरकोइल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोइल एक्सप्रेसच्या कोचमध्ये बदल करण्यात आले आहे, असे सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.गाडी क्र.१६३३९/१६३४० आणि १६३५१/१६३५२ नागरकोइल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोइल या एक्सप्रेसच्या कोचमध्ये बदल करण्यात आले आहे.सोलापूर विभागातून धावणारी गाडी क्र. १६३३९/१६३४० आणि १६३५१/१६३५२ नागरकोइल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोइल एक्सप्रेसच्या एकूण सहा रेकच्या कोचमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ते पुढील प्रमाणे आहे : वर्तमान संरचना: १- द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ५ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ९ शयनयान, २ जनरल, १- वातानुकूलित पेंट्रीकार, २-उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन, २गार्ड ब्रेक वॅन एकूण – २२ कोच होते.
सुधारित संरचना: १- द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ९ शयनयान, ४ जनरल, १-वातानुकूलित पेंट्रीकार, २-उच्च क्षमतेची पार्सल व्हॅन, २ गार्ड ब्रेक वॅन एकूण- २२ कोच असतील. परिवर्तित : दि. १४-११-२०२४ आणि १५-११-२०२४ रोजी गाडी क्र. १६४३० नागरकोइल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर दि. १५-११-२०२४ आणि १६-११-२०२४ रोजी गाडी क्र. १६३४० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोइल एक्सप्रेस मध्ये परिवर्तन करण्यात येईल.