“सिरत-ए-मुस्तफा सल्लालाह आलिही सल्लम” परीक्षेचे आयोजन
By assal solapuri||
सोलापूर : दरवर्षाप्रमाणे यंदाही मोहम्मद पैगंबर यांची जयंती; या इस्लामिक धर्माच्या पवित्र दिनानिमिंत “जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नाबी”च्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुफ्ती अब्दुल कादीर मरकजी साहब यांनी पत्रकार परिषदेत दिली. “जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नाबी”निमित्त तन्जिम फरोगे इस्लाम शाखा (भिवंडी) आणि एन.ए.एस.जे. सोलापूर यांच्यातर्फे दुसरी “सिरत-ए-मुस्तफा सल्लालाह आलिही सल्लम” परीक्षा आयोजित करण्यात आले आहे.
जश्रे ईद-ए-मिलादुन्नबी व सिरत-ए-मुस्तफा सल्लालाहू आलिही व सल्लम परीक्षा आदी उपक्रम पार पडणार आहेत. बुधवार, दि ३१ जुलै रोजी शहेनशाह-ए-सोलापूर हजरत सय्यद शाह्जहूर दर्गाह येथे उलाम-ए-एह्ले सुन्नत यांची बैठक पार पडली. या बैठकीत जश्रे ईद-ए-मिलादुन्नबी व सिरत-ए- नौजावानाने अहले सुन्नत व जमात सोलापूर यांच्यावतीने मुस्तफा सल्लालाहू आलिही व सल्लम परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नाबीच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक धर्म पन्तियांनी आपापले घर, परीसर व शहरभर भरपूर सजावट करावी. ईद-ए- मिलादुन्नबी सल्लालाहू आलिही व सल्लम मोठ्या आनंदी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. या पवित्र दिवशी होणारे गैर इस्लामिक कार्य जसे कि., कर्णकर्कश संगीत, वाद्य व हुल्लडबाजी होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वसामान्य, गोर गरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर खाऊ, अन्नदान वाटप, भोजन आदी कार्यक्रम आपआपल्या परिसरात आयोजित करण्यात यावे. यानिमित्य तन्जिम फरोगे इस्लाम शाखा (भिवंडी) व एन.ए.एस.जे. सोलापूर यांच्यातर्फे दुसरी “सिरत-ए-मुस्तफा सल्लालाह आलिही सल्लम” परीक्षा आयोजित करण्यात येत असून, याबद्दलच्या माहितीसाठी शहरात ठीक ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर व पोम्प्लेटमध्ये दिलेल्या व्यक्तींना किंवा एन.ए.एस.जे. सोलापूर यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या परीक्षेत भाग घेणाऱ्यांचे वय कमीत कमी १२ वर्षे व त्याहून अधिक असावे. परीक्षार्थी ही परीक्षा भाषा हिंदी, उर्दू किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकतील. परीक्षेत भाग घेणाऱ्या सर्वसामन्यांसाठी फार्म फी पुस्तक सहित ३५० रुपये आहे. शाळा व महाविद्यालायातील विद्यार्थ्यांकरिता फार्म फी पुस्तक सहित 300 रुपये राहील. याबद्दलचे या परीक्षेतील प्रथम विज्येतासाठी प्रथम बक्षीस उमरह, बैतूलमुकद्दस, बगदाद. द्वितीय बक्षीस उमरह, बगदाद यात्रा, तृतीय क्रमांकासाठी उमरह यात्रा अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
सदरची परीक्षा रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ एम. ए. पानगल अंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी नी “सिरत-ए-मुस्तफा सल्लालाहू सर्वसामन्यांसाठी पैगंबर सल्लालाहू आलिही व सल्लम यांचा जीवन परिचय करून घ्यावे. आपल्या जीवनात अनुकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत मुफ्ती जुबेर अहमद अलिमी शम्सी साहब, मौलाना इसराफिल रजा बलरामपुरी साहब, मौलाना हाफिज सुलेमान रजवी साहब, मौलाना हाफिज तनवीर नक्शबंदी साहब, मौलाना मसूद रजा कादरी साहब, मौलाना बदरुद्दूजा फैजी रजवी साहब, मौलाना तौफीर अमानी साहब, हाजी अय्यूब कुरेशी साहब, एन.ए. एस.जे ट्रस्ट, सोलापूरचे अध्यक्ष सुहैल सौदागर, अशपाक शेख व एन.ए.एस.जे ट्रस्ट कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.