घरबसल्या सोलापूरसह, देश-विदेशातील भाविक भक्तांना महर्षी मार्कंडेय महामुनींच्या दर्शनाची सोय उपलब्ध होणार

चौथा श्रावणी सोमवार, नारळी पौर्णिमा-रक्षा बंधनानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्था, पद्मशाली वर्ल्ड वाईड, श्री मार्कंडेय सोशल  फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघमचा उपक्रम

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विशेष सहकार्याने पद्मशाली वर्ल्ड वाईड, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संघम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरसह देश आणि विदेशातील पद्मशाली समाज बांधवांसाठी यंदाच्या वर्षी चौथा श्रावणी सोमवार, नारळी पौर्णिमा (रक्षा बंधन) या खास दिनानिमित्त  घरबसल्या श्री मार्कंडेय मंदिरातून महर्षी मार्कंडेय महामुनींच्या दर्शनाची आणि विधीवत महापूजेची थेट प्रक्षेपणाद्वारे (Live Streaming) दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हा उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून, भारतासह ३० पेक्षा अधिक विदेशांतील पद्मशाली बांधवांना कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेण्याची आणि भक्तिभावाने सहभागी होण्याची अनोखी संधी यातून मिळणार आहे. पद्मशाली समाज भारतभर आणि परदेशांमध्ये शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने विखुरलेला आहे. या सर्व बांधवांना श्रावण महिन्यात घरबसल्या पूजा-दर्शनाची संधी मिळावी, यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

श्रावण सोमवार आणि नारळी पौर्णिमेच्या तारखा पुढीलप्रमाणे व थेट प्रक्षेपणाची वेळ :- 

पहिला श्रावण सोमवार : २८ जुलै; दुसरा सोमवार : ४ ऑगस्ट; तिसरा सोमवार : ११ ऑगस्ट; नारळी पौर्णिमा (रक्षा बंधन) : ९ ऑगस्ट (सकाळी ४ ते ६ या वेळेत); आणि चौथा व अंतिम सोमवार : १८ ऑगस्ट या चारही सोमवारी सकाळी ६.१५ ते ७.०० दरम्यान थेट पूजेसह दर्शन घेता येणार आहे.

उपक्रमामागे गौरीशंकर कोंडा यांची संकल्पना असून, याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनुप मुरलीधर अल्ले व ब्रदर्स, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी – सदस्य, पद्मशाली सखी संघमच्या महिला पदाधिकारी – सदस्यांची मोलाचे सहभाग आहे. श्री मार्कंडेय मंदिराचे पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचेही विशेष सहकार्य मिळत आहे. अधिक माहितीसाठी ‪(919021551431) या क्रमांकावर संपर्क साधावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *