PADMNAGAR BASKETBALL TEAM WINNER
आ. देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
अस्सल सोलापुरी ||
BASKETBALL COMPETATION: सोलापूर : आ. देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित (BASKETBALL) बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल मुलींचा संघ विजयी तर मुलांचा संघ उपविजेता ठरला.
आ. देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शक्ती केंद्र प्रमुख बाबुराव क्षीरसागर यांची आयोजित या बास्केटबॉल स्पर्धेत पद्मनगर बास्केटबॉल मुलींच्या संघाने विडी घरकुल सोशल स्कूल, गणेश विद्यालय आणि भारती विद्यापीठ संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या संघात कर्णधार बालत्रिशा कामुर्ती, सेजल येदूर, रोशनी ताटीपामूल, वैशाली कुनगुंटी, सिंघुजा सिंघम, नक्षत्रा मिठ्ठाकोल, ऐश्वर्या कामुर्ती, श्रेया कुनगुंटी, पूजा कुनगुंटी यांचा समावेश होता.

या संघास प्रशिक्षक श्रीधर गायकवाड, प्रबुद्ध चिंचोळीकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष आनंद वल्लाकाठी, श्रीशैल गुरव,स्वाती कोठे,श्रीधर ताटीपामूल, सुशील नाटकर,विशाल बनसोडे, अश्वीन येदूर यांनी अभिनंदन केले आहे.