प्रसिद्ध, ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे यांची डॉ. बाहुबली दोशी घेणार प्रकट मुलाखत
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : श्रुति-मंदिर सोलापूर यांच्यावतीने यंदाचा गुरुवर्य पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्कार प्रसिद्ध, ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती गुरुवर्य पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्कार-२०२४ समितीचे अध्यक्ष ॲड. जे.जे. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक सभागृह, अॅम्फी थिएटर, सोलापूर येथे होणार आहे.
ऑर्गनवादन प्रखट मुलाखत संजय देशपांडे यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार डॉ. बाहुबली दोशी हे घेणार आहेत. सत्कार समारंभानंतर सत्कारमूर्ती संजय देशपांडे हे ऑर्गनवर मराठी नाटकांतील जुनी नाट्यगीते सादर करणार आहे.
श्रुति-मंदिर सोलापूर या संस्थेचे संस्थापक, शासन सन्मानित आदर्श शिक्षक, संगीत तज्ञ, नाट्य दिग्दर्शक स्व. पद्माकर देव यांचे जन्मशताब्दि वर्ष २८- नोव्हेंबर १९२४ ते २८ नोव्हेंबर २०२४ साजरे करण्याचे योजिले आहे. त्याअंतर्गत प्रसिद्ध, ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे यांना गुरुवर्य पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा समारंभाचे अध्यक्ष कलाप्रेमी, नाट्यरसिक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे पहिल्या महिला खासदार यांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांनासाठी खुला असून, कार्यक्रम वेळेवर सुरु होईल, असे गुरुवर्य पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्कार-२०२४ समितीचे कार्यवाहक विद्या काळे, अध्यक्ष अॅड.जे.जे. कुलकर्णी यांनी कळविले आहे.