पद्म-बिझनेस वुमन अवॉर्ड, पद्म जलपरी पुरस्काराचे थाटात वितरण

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतिका श्रीराम, श्रध्दा यलगम सन्मानित

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पद्मशाली समाजातील कर्तृत्ववान व कर्तबगार महिलांना ‘पद्म-बिझनेस वुमन अवॉर्ड व पद्म-जलपरी पुरस्कार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन, पद्मशाली सखी संघम आणि पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात पार पडला.

यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, श्री मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, वासुदेव इप्पलपल्ली, देवीदास गोटीपामूल, अरविंद चिन्नी, सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, वैकुंठम् जडल, माजी नगरसेविका सरिता वडनाल, पार्वतय्या श्रीराम, कांचना श्रीराम  आदी मान्यवर उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान:

ऋतिका श्रीराम, श्रद्धा यलगम, आरती बेत, दिव्या पेंटा, सुजाता बेनगिरी, कला चन्नापट्टण, कस्तुरी भंडारी, लता म्याकल, भाग्यश्री पुंजाल, श्रावणी जिंदम

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतिका श्रीराम, आणि वयाच्या ३४ वर्षीही जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणा-या श्रध्दा यलगम यांना ‘पद्म-जलपरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कंपनी सचिव म्हणून औद्योगिक जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरती बेत, स्वतःच ब्रँड स्वतःच निर्माण करणा-या दिव्या पेंटा, स्वतःचे कौशल्य वापरुन गारमेंट व्यवसाय करणा-या सुजाता बेनगिरी, सामाजिक तळमळ व काहीतरी वेगळापणा जपणा-या कला चन्नापट्टण, जिद्द व चिकाटीने बेसिन, नॅपकीन तयार करून वर्षाकाठी ४० लाखापर्यंत व्यवसाय करणा-या कस्तुरी भंडारी,  संपूर्ण भारतात नॅपकीन बुके पुरवठा करणा-या लता म्याकल, संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणा-या भाग्यश्री पुंजाल आणि वास्तूक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ऑर्किटेक्चर श्रावणी जिंदम (मद्दा) यांना मान्यवरांच्या हस्ते ‘पद्म-बिझनेस वुमन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, शाल व नॅपकीन बुके असे पुरस्काराचे स्वरुप होते. उद्योजक श्रीधर सुर्रा यांच्यातर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

प्रास्ताविक  फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी केले. सूत्रसंचालन, स्वागत कवयित्री रेणुका बुधारम यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन सखी संघमच्या ममता तलकोकूल यांनी केले. आभार प्रदर्शन माजी अध्यक्षा मेघा इट्टम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली,  सखी संघमच्या ऋचिता मासम,  सविता येदूर, ममता मुदगुंडी, पल्लवी संगा, वनिता सुर्रम,  हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा यांचे सहकार्य लाभले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *