सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
By Kanya News||
सोलापूर : सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साही वातावरणात पार पडली. सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच संघटनेने 20 व्या वर्षात पदार्पण केले.
या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार टेळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघ निवड समितीमध्ये सलग दुसऱ्यांदा रोहित जाधव यांची निवड झाली असून, त्यांचा सत्कार पंच संघटनेकडून करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार टेळे यांची महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेमध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाल्याने संघटनेकडून त्यांचादेखील सत्कार करण्यात आला.
या सभेमध्ये २०२३-२४ या वर्षीचा उत्कृष्ट पंच म्हणून नवीन माने यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट उदोन्मुख पंच म्हणून दयानंद नवले यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार टेळे, उपाध्यक्ष मंजुनाथ बिराजदार, सचिव अतिक शेख, खजिनदार सुर्यकांत खंडेलवाल, ज्येष्ठ पंच सुहील मुन्शी, चंद्रकांत मंजेली आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश कोंपल यांनी केले.
