साक्षी गिट्टे, डॉ. अमृता भोसले ठरल्या मिस, मिसेस ग्रीन सोलापूरच्या विजेत्या

मिस्टर ग्रीन सोलापूर कॅटेगरीमध्ये विक्रांत वरुडे विजेते

गौरा इन फॅशन क्लबच्या मिस, मिसेस, मिस्टर ग्रीन सोलापूर सौंदर्य स्पर्धा स्पर्धेचे बक्षीस वितरण

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  साक्षी गिट्टे, डॉ. अमृता भोसले यांनी अनुक्रमे  मिस, मिसेस ग्रीन सोलापूरचे विजेतेपद पटकावले. मिस कॅटेगरीमध्ये प्रथम उपविजेती सेजल पिल्ले तर  द्वितीय उपविजेती डॉ. आस्था ललकपाटील ठरल्या. मिसेस कॅटेगरीमध्ये उमा नागणसुरे  प्रथम उपविजेती  तर डॉ. शीतल कोरे या द्वितीय उपविजेती ठरल्या. मिस्टर ग्रीन सोलापूर कॅटेगरीमध्ये विक्रांत वरुडे विजेते ठरले.  याच कॅटेगरीमध्ये  प्रथम उपविजेते शशांक पाठक तर सुनील कर्वे द्वितीय उपविजेते ठरले.

गौरा मिस, मिसेस व मिस्टर ग्रीन सोलापूर तसेच गौरा किड्स रनवे-२०२४ (सिजन-६) ची सौंदर्य स्पर्धा (ग्रँड फिनाले) हॉटेल बालाजी सरोवर प्रिमीअर सोलापूर येथे नुकतीच पार पडली.

या स्पर्धांमध्ये एकूण २६० स्पर्धकांचे ऑडिशन घेण्यात आले. त्यातून अंतिम फेरीसाठी ४० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यांचे ५ दिवसांचे ग्रुमिंग वर्कशॉप घेण्यात आले. ज्यामध्ये स्पर्धकांना सॉफ्ट स्किल्स, देह बोली, संभाषण कला,  रॅम्प वॉक, कॅट वॉक  अशा विविध व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आवश्यक गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या होत्या. या सौंदर्य स्पर्धेत ५ ते १२ वयोगटातील लहान मुलांसाठी रनवे-शो झाला.  १६ ते ४५ वयोगटातील महिला व पुरुष यांनी सौंदर्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले.

या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी  बालाजी अमाईन्सचे संचालक राम रेड्डी, स्पेनका मिनरल वॉटरचे संचालक सुहास अदमाने, जीएसटी कमिशनर रवी गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी जुरी पॅनलचे राजीव देसाई, एस.डी.आर. फाउंडेशनचे चेअरमन डॉ. सिमा अनिल इंगोले, अमर सरनाईक, पल्लवी शिवकुमारश्री, मिसेस इंडिया गौरी नाईक  उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये चंदू(काका) सराफ यांच्या डायमंड  ज्वेलरी राउंडने प्रेक्षकांची मने जिंकली.  यंदाच्या स्पर्धेची संकल्पना हीगो ग्रीन या थीमवर होती. त्यामुळे स्पर्धेतील फायनालिस्टकडून वृक्षारोपण करून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. यावेळी लहान स्पर्धकांनीदेखील यात उत्साहाने भाग घेतला होता. याढेही अशाच पद्धतीने  झाडे लावण्याचा संकल्प यातून सुरु राहील, असे आयोजिका गौरी नाईक व जयंत पाटील यांनी प्रास्ताविकातून सांगितले. यापुढेही अशाच प्रकारच्या सौंदर्य स्पर्धा दरवर्षी सोलापूरमध्ये आयोजीत केल्या जातील, असे  गौरा इन फॅशन क्लबच्या प्रमुख गौरी नाईक व जयंत पाटील यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *