प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास,भोजन व्यव्यस्था
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण आधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. ३० डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधित ( SSB/एसएसबी कोर्स क्र.६०) आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण , निवास व भोजन दिले जाणार आहे.
सोलापूर जिल्हयातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदांची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दि. २ जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसब्ल्यू/DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील (SSB-60) या कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.
एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद कोणतीही एक पात्रता असणेआवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना घेवून यावे. प्रशिक्षणार्थी कम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSE) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSE) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. व त्यासाठी एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेली असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापिठ प्रवेश प्रणाली (युनिर्व्हसिटी इनट्री स्कीम) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्र प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा ई मेल आडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. (०२५३-२४५१०३२) किंवा व्हाटसअप क्र. (९१६०७३३०६) या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सोलापूर यांनी केले आहे.