सोलापुरात ऑनलाईन योगा, ऑफलाईन आरी वर्कशॉपचे आयोजन

महर्षी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशनचा उपक्रम!

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : महर्षी श्री मार्कंडेय जन्मोत्सवाचे औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशनच्यावतीने सर्व समाजातील महिलांसाठी ऑनलाईन योगा, आणि ऑफलाईन आरी वर्कशॉप आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिली आहे.

महिलांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी उत्कर्षा वेंकटरमण कुचन  या दि. २० ते २४  जानेवारीपर्यंत  पाच दिवस दररोज सकाळी ८ ते ८.४५ यावेळेत घरबसल्या मोफत ऑनलाईन योगाचे धडे देणार आहेत.

उत्कर्षा वेंकटरमण कुचन यांचा  योगा शिकवण्यामध्ये  दहा वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी  योग शास्त्रामध्ये एम.ए. ही पदवी प्राप्त केली आहे.  त्या डिप्लोमाधारकही आहेत. ऑनलाईन योगामध्ये महिलांना सर्वरोग निवारणासाठी सूर्यनमस्कार,महिलांच्या मासिक पाळीमधील आजार PCOD, PCOS आणि BP (उच्च रक्तदाब),  Sugar (मधुमेह), मायग्रेन, स्पोंडिलायसेस अशा सर्व आजारांवर मात करण्यासाठी आसने व प्राणायम शिकवले जातील. फक्त महिलांनी असलेल्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी  (9014595939) या क्रमांकावर संपर्क साधावा.

आरी वर्कशॉप :  दि. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत हे वर्कशॉप फक्त महिलांसाठीच असणार आहे. यासाठी  नाममात्र फी असून, हे वर्कशॉप १४ दिवस चालणार आहे.  आरी वर्कसाठी शिकण्यासाठी लागणारे साहित्य स्वतः आणावयाचे आहेत. हे प्रशिक्षण वेलकम फाऊंडेशनचे संचालिका उमा बिल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सध्याच्या काळात  आरी वर्कला भरपूर मागणी आहे. शिकून स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. हे वर्कशॉप महिलांसाठीच असून,  (7304357225)  या क्रमांकावर संपर्क साधावा.  

सदरील वर्कशॉप अशोक चौक परिसरातील श्री गणेश मंदिरजवळ, साईबाबा चौक येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा (9021551431) आणि फाऊंडेशनच्या (Shreemarkandaysocialfoundation@gmail.com) या ईमेलवरही संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनचे प्रेसिडेंट लक्ष्मण दोंतूल,उपाध्यक्ष श्रीनिवास कामुर्ती, नागेश पासकंटी, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम,दयानंद कोंडाबत्तीन, श्रीनिवास रच्चा, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, सतीश चिटमील, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *