महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन
by assal solapuri ||
सोलापूर : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अंतर्गत प्रोत्साहन लाभापासून वंचित कर्जदार शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, आधार प्रामाणिकरणामुळे बरेच शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.

तरी योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या ( विशिष्ट क्रमांक देण्या आलेल्या ) परंतु , आधारप्रमाणिकरण न लेलेल्या कर्जदार शेतकरी यांनी प्रोत्साहन लाभ मिळण्यासाठी नजिकचे आपले सरकार सेवा केंद्रात दि. ७ सप्टेंबर २०२४ पूर्वी जाऊन आधार प्रमाणिकरण त्वरीत करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था सोलापूर, किरण गायकवाड यांनी केले आहे.