राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११४१३ प्रकरणे तडजोडीने निकाली, ११४ कोटींच्या रकमेची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११४१३ प्रकरणे तडजोडीने निकाली, ११४ कोटींच्या रकमेची वसुली

वाहतूक शाखेच्या ई–चलनद्रारे २०,५५,००० रुपयांची वसुली

by assal solapuri ।।

सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५७०१९२ प्रलंबित प्रकरणे व ६५८९४ दाखल पुर्व प्रकरणे असे एकूण १२२९०६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७०८७ प्रलंबित प्रकरणात तडजोड झाले. ४३२६ दाखलपुर्व प्रकरणे असे एकूण ११४१३ आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात आली. यावेळी ११४ कोटींच्या रकमेची तडजोड झाली. यावेळी जवळपास ९९४४५६२८३४ रुपये (अक्षरी एकशे चौदा कोटी पंचेचाळीस लाख बासष्ट हजार आठशे चौतीस रुपये ) एवढया रकमेची तडजोड करण्यात आली. या लोक अदालातीमध्ये शहर वाहतूक व ग्रामीण शाखा सोलापूरच्यावतीने ई–चलनद्रारे २०,५५,००० रुपये इतकी रक्‍कम वसुली झाली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे दि. २७ जुलै २०२४ रोजी जिल्हा विधी सेवा प्राथविकरणातर्फे सोलापूर शहर व सर्व तालुक्यामधील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. सदर लोकन्यायालयाचे उद्घाटन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी तयार केलेले ” एकमुठ्ठी आसमान” या गीताने झाली.

  • सोलापूर जिल्हा न्यायालयातील पॅनलवर न्यायाधीश वाय. ए. राणे, जे. एम. काकडे, एस. डी. गावडे, पी. पी. पेठकर, डी. आर. भोला, व्ही. एम. रेडकर, एस. आर. सातभाई, डी. जी. कंखरे, एस. पी. पाटील, व्ही. पी. कुंभार, एम. के कोठुळे, एम. पी. मर्ढेकर, व्ही. ए. कुलकर्णी या न्यायीक अधिकाऱ्यांनी काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून लोकअभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ स्नेहल राऊत, झुरळे, सोलनकर, रेवण पाटील, नवले, म्हेत्रे, किणगी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पॅनलवरील कर्ले, मोरडे यांनी काम पाहिले. सदर उद्घाटन प्रसंगी पॅनलवरील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायाधीश-२ पी. एस. खुणे, महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, सोलापूर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अमित आळंगे, विधिज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पल्लवी पैठणकर, लोकअभिरक्षक कार्यालयातील सर्व विधिज्ञ, जिल्हा न्यायालय सोलापूर येथील कर्मचारी उपस्थित होते.
    ===============================================================================================
    यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सोलापूर मो. सलमान आझमी यांनी उद्घाटनप्रसंगी म्हणाले, राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरण मिटविण्यात यावे. लोकअदालतमध्ये प्रकरण तडजोडी करून मिटविल्यास वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये निर्माण झालेली द्वेष भावना संपुष्टात येईल. त्यामुळे एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल. यामध्ये दोन्ही पक्षाचा विजय होईल. चलनक्षम दस्तावेजमधील प्रकरण लोक न्यायालयामध्ये मिटविल्यास वादीस पुर्णपणे न्यायालय मुद्रांक परत मिळेल. पक्षकार यांचा वेळ, पैसा, श्रमही वाचेल, असे प्रतिपादन केले.
    ===================================================================================================
    सदर लोक न्यायालयामध्ये जिल्हयात एकूण ३९ पॅनल निर्मिती करण्यात आली होती. सदर लोक न्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार वाहन प्रकरणे, भुसंपादन, दरखास्त व कलम १९३८ चलनक्षम कायद्याची, कोटुंबिक वाद वगैरेची न्यायप्रविष्ट प्रकरणे, बॅका, टेलिफोन कंपनी, विविध वित्तीय संस्था यांची दाखलपुर्व प्रकरणे, वाहतूक शाखा, सोलापूर ई-चलन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. सदर लोक न्यायालय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मो. सलमान आझमी, दिवाणी न्यायाधीश व.स्तर तथा सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघटना व पक्षकार यांचे सहकार्याने पार पडले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *