एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ एमटीएल ४०० वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धा
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अव्वल मानांकित सोलापूरच्या संध्याराणी बंडगर हिने दुसऱ्या मानांकित बंगळुरूच्या स्मिता रवींद्रचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (एसडीएलटीए) यांच्यावतीने आयोजित व आयटीफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली झालेल्या एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ एमटी ४०० वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील ४५ वर्षावरील महिलांच्या गटातील अंतिम फेरीत तिने ही विजयी कामगिरी केली.

एमएसएलटीए टेनिस सेंटर आणि इलीसीएम क्लब जामश्री कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर पेठ येथे झालेल्या स्पर्धेत ५० वर्षावरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित शंकर सुब्रमण्यम याने चौथ्या मानांकित अवनीश रस्तोगीचा ७-५, ३-६, १०-७ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. तिसऱ्या मानांकित आशिष पंतने मकतुमसाहेब काझीचा ७-५,६-१ असा तर, क्वामुद्दीन खान याने मधुसूदन मुरलीधरचा ७-५, ६-४ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
३५ वर्षावरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित चांद शेख याने मनोलिन सेथुनाथला ६-३, ६-४ अशा सेटने पराभूत केले. पुण्याच्या दुसऱ्या मानांकित अरुण भोसले याने आरुष शहाचा ६-२, ६-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. ६० वर्षांवरील पुरुष गटात पहिल्या फेरीत राजीव देसाईने सूरज झंझोटेवर ६-१, ६-० असा सहज विजय मिळवला. सुदेश सिंगने नवीन सोनीचे आव्हान ६-१, ६-३ असे मोडीत काढले.
या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या पर्यवेक्षक वैशाली शेकटकर, स्पर्धा संचालक डोसा रामाराव, एमएसएलटीएचे सह मानद सचिव राजीव देसाई, आंतरराष्ट्रीय टेनिस पटू संध्याराणी बंडगर , दिलीप बच्चुवर , पंकज शहा, कर्नल देवानंद मठपती, डॉ. राजू कारंडे, रूपेश बिद्री, कुमार रव्वा यांच्यासह खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते . स्पर्धेत देशभरातून एकूण १७५ खेळाडू सहभागी झाले आहेत.

निकाल: ३० वर्षावरील पुरुष गट:
पहिली फेरी:
माधव गोपालन (भारत )वि.वि.शेखर जैस्वाल (भारत) ५-७, ६-४, १०-७.
संग्राम कोतवाल (भारत) वि.वि.ऋषिकेश अराली (भारत) ६-१, ६-१.
गौरव राव (भारत) वि.वि.आशिष चौहान (भारत) ६-२, ६-२.
३५ वर्षावरील पुरुष गट:
उपांत्यपूर्व फेरी:
चांद शेख [१] (भारत) वि.वि. मनोलिन सेथुनाथ (भारत) ६-३, ६-४.
अजय सोधातर (भारत) वि.वि.हाफिज बेग (भारत) ६-४, ६-२.
अरुण भोसले [२] (भारत) वि.वि.आरुष शहा (भारत) ६-२, ६-४.
४५ वर्षांवरील पुरुष गट:
दुसरी फेरी:
यती गुजराती (भारत) वि.वि. बोसेकिरण नल्लामोथू (भारत) ४-६, ६-१, १०-६.
भरत परमार [५] (भारत) वि.वि.सरफराज काझी (भारत) ६-०,६-०.
नितेश रुग्ता [६] (भारत) वि.वि.कुमार रव्वा (भारत) ६-३, ६-३.
अमित टिळक [२] (भारत) वि.वि.अपूर्व यतींद्र (भारत) ६-०,६-१.
संदीप पवार (भारत) वि.वि.रवींद्र पांडे (भारत) ६-१,६-३.
गौतम गाडगीळ [४] (भारत) वि.वि.के अमित रेड्डी (भारत) ३-६, ६-३, ११-९.
महिला ४५ वर्षावरील गट:
अंतिम फेरी:
संध्याराणी बंडगर [१] (भारत) वि.वि.स्मिता रवींद्र [२] (भारत) ६-२, ६-४.
३० वर्षावरील महिला गट:
उपांत्य फेरी:
वैभवी त्रिवेदी (भारत) वि.वि.माधुरी पातेरे (भारत) ६-०,६-१.
५० वर्षावरील पुरुष:
उपांत्यपूर्व फेरी:
शंकर सुब्रमण्यम (भारत) वि.वि.अवनीश रस्तोगी [४] (भारत) ७-५, ३-६,१०-७.
आशिष पंत [३] (भारत) वि.वि.मकतुमसाहेब काझी (भारत) ७-५, ६-१.
क्वामुद्दीन खान (भारत) वि.वि.मधुसूदन मुरलीधर (भारत) ७-५, ६-४.
६० वर्षांवरील पुरुष:
पहिली फेरी:
राजीव देसाई (भारत) वि.वि.सूरज झंझोटे (भारत) ६-१, ६-०.
सुदेश सिंग (भारत) वि.वि.नवीन सोनी (भारत) ६-१, ६-३.
देव मिश्रा (भारत) वि.वि.संजय कालगावकर (भारत) ६-०, ६-१.
