पहिलवान पुरुषोत्तम कुलकर्णीचे वर्चस्व

ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत भरीव कामगिरी

by assal solapuri ||

सोलापूर : शालेय शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिलवान पुरुषोत्तम नरसिंह कुलकर्णी प्रतिस्पर्धी मल्लांना चीतपट करीत प्रथम क्रमांकासह स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. सोलापूर महापालिकेच्यावतीने आयोजित शालेय कुस्ती स्पर्धेत  न्यू हायस्कूल सलगरवाडी शाळेकडून खेळताना  त्याने ही  कामगिरी केली.

पहिलवान पुरुषोत्तम नरसिंह कुलकर्णी याने सलग दोन फेऱ्यामध्ये ज्ञानप्रबोधीनी हायस्कूलच्या दोन्ही मल्लांचा  ४५ किलो आतील वजनी गटातील ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत दहा गुण मिळवत  प्रतिस्पर्धी मल्लांना चीतपट करीत निर्विवाद यश संपादन करून प्रथम क्रमांक मिळविला.

त्याला डबल उप महाराष्ट्र केसरी भरत मेकाले, क्रीडा शिक्षक पवार, मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. पुरुषोत्तम नरसिंह कुलकर्णी हा अक्कलकोतातील श्री स्वामी समर्थ  अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष मा. अमोलराजे भोसले यांच्या पैलवान ग्रुप चा पैलवान आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *