कापूस, सोयाबीनसह अन्य  तेलबिया उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 

 

image source          image source

कापूस, सोयाबीनसह अन्य  तेलबिया उत्पादकता वाढ,

मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर (mahadbt.maharashtra.gov.in farmer login) अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गावसाने  यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामात बॅटरी संचलित फवारणी पंपाचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडिबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर शेतक-यांना अर्ज करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा. कृषी यांत्रिकीकरण या टाईलअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करा येतील. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे  आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गावसाने  यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *